गेल्या आठवड्याभरापासून या जोडप्याच्या फोटोनं सोशल मीडियावर नुसता कल्ला केलाय. हे जोडपे सर्वांच्या मस्करीचा विषय बनले होते. काही फेसबुक पेजनी तयार केलेले या जोडप्याचे मीम सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. ज्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे ते नक्की आहेत तरी कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर हे आहे कॉलीवूडमधलं प्रसिद्ध जोडपं एटली कुमार आणि कृष्णा प्रिया.

एटली कुमार हा दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे. तर कृष्णा प्रिया ही प्रसिद्ध टीव्ही कलाकार आहे. प्रियाचं सुंदर दिसणं आणि एटलीचा रंग या दोन कारणांमुळे या दोघांची अनेकांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवली. गेल्या आठ वर्षांपासून ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. २००६ साली प्रिया एका मालिकेत काम करत होती. याच मालिकेत एटलीचा मित्र देखील काम करायचा. त्यानेच प्रिया आणि एटलीची भेट घालून दिली होती. आठ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर २०१४ मध्ये या दोघांनी लग्न केले.
‘राजा राणी’ हा एटलीचा पहिला चित्रपट होता. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट खूपच गाजला होता. कोट्यवधीचा गल्ला या चित्रपटाने जमवला होता. त्यानंतर एटलीनं दिग्दर्शित केलेले इतर तीन चित्रपट देखील तुफान गाजले. पण दुर्दैवानं एटलीच्या कामापेक्षा लोकांनी त्याच्या रंगाला महत्त्व देऊन सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं.

Pregnant Woman, Injured by Falling Stone, Nerul, police register fir, Blasting Work Halted, navi mumbai news, marathi news, blasting for construction site, nerul construction site, construction site, builder construction site, nerul railway station west,
स्फोटप्रकरणी विकासकावर गुन्हा; नेरुळमधील स्फोटांचे काम बंद, नगररचना विभागाची विकासकाला कारणे दाखवा नोटीस
diy barley water summer benefits hydration uti why you must include a glass of barley water to summer routine
उन्हाळ्यात रोज प्या एक ग्लास बार्लीचे पाणी; मिळतील डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ जबरदस्त फायदे
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
Bengaluru firm workers hire goons to beat strict colleague arrested video viral
कामाचा दबाव टाकणाऱ्या व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांनी गुंडांच्या मदतीने केली बेदम मारहाण; पाहा धक्कादायक Video