मी दीपाली, मी २८ वर्षांची असून विवाहित आहे. माझी उंची ५.८ असून वजन ५६ किलो आहे. माझं कॉम्प्लेक्शन डस्की आहे. केस सरळ आणि मीडियम लेन्थचे आहेत. मी एक व्यावसायिक असून मला नेहमी विविध लोकांच्या भेटी घ्याव्या लागतात. मीटिंग्स आणि सेमिनार अटेंड करावी लागतात. प्रत्येक वेळी मी कपडय़ांबाबत तसेच मेकअप, हेयर स्टाइल याबाबत कायम गोंधळून जाते. त्यामुळे मला साजेशी अशी स्टाइल सुचवा.
हाय दीपाली,
तू मस्त उंच आणि स्लिम आहेस. त्यामुळे तुला चिंता करायची गरजच नाही. पहिल्यांदा तुझा कपडय़ाबद्दलचा प्रश्न आपण सोडवू. तुझं कामचं स्वरूप पाहता तू फॉर्मल्स किंवा सेमी फॉर्मल्स वापरणं योग्य ठरेल.
छान फिटिंग असलेले शर्ट्स वापर. त्याच्या फॅब्रिक्समध्ये तू व्हेरिएशन्स करू शकतेस. कॉटन, लिनन, जॉर्जेट फॅब्रिक्स वापरू शकतेस. त्याच बरोबर लहान लहान सुंदर डिझाइन असलेले फॉर्मल शर्ट्स तू वापरू शकतेस. त्यामध्ये लहान लहान प्लेट्स, पिन टक्स, चायनीज कॉलर, पफ स्लीव्ह्स् किंवा लहान सुंदर फ्रिल असे प्रकार तू नक्कीच वापरू शकतेस. त्याच बरोबर सॉलिड कलर्समधील फॉर्मल्स तू नक्की वापरू शकतेस. त्याचबरोबर तू चेक्स, स्ट्रिप्स किंवा खूप लहान चेक्स असे डिजाइन्ससुद्धा ट्राय करू शकतेस. बॉट्म्समध्ये तू नि-लेन्थ पेन्सील स्कर्ट्स वापरू शकतेस. तुझ्या फिगरला तो उत्तम दिसेल. त्याचबरोबर स्लिम फिटेड फॉर्मल पॅण्ट तू वापर. कधी कधी पालाझोज ट्राय करायला हरकत नाही. जास्त घेर नसेल अशाच पालाझो पँट्स घाल.
डस्की स्किनसाठी तू रॉयल ब्लू, बन्र्ट ऑरेंज, ऑलिव्ह ग्रीन असे कलर्स नक्की वापर. त्याचबरोबर नेहमीचे ब्लॅक, बेज, व्हाईट, ग्रे, नेव्ही असे कलर्स तर चांगले दिसतीलच. क्लोज्ड पॉइंटेड शूज, लहान हिल्स किंवा फ्लॅट्स वापर. फॉर्मल्सवर असे फूटवेअर एकदम सूट होतात.
अ‍ॅक्सेसरीज जास्त भडक किंवा हेवी वापरू नको. बारीक चेन आणि लहान पेंडंट असं काही तरी वापर. मेटल अ‍ॅक्सेसरीज वापर. प्लास्टिकच्या अ‍ॅक्सेसरीज नकोत. लहान बारीकसे कानातलेसुद्धा छान दिसतील. तुझं घडय़ाळ तुझ्या लुकचं स्टेटमेंट असू दे. सुंदर गोल्ड किंवा सिल्व्हर मेटलचं घडय़ाळ वापर. ब्रँडेड असेल तर उत्तम. रिच घडय़ाळ तुझ्या अटायरला एकदम उठावदार दिसेल. त्याचबरोबर एखादी सुंदर क्लासी बॅग किंवा पर्स वापर. टॅन, ब्लॅक किंवा नॅचरल प्युअर लेदरची ब्रँडेड बॅग असेल तर उत्तमच.
खूप भडक मेकअप पूर्णपणे टाळ. त्यापेक्षा हलका मेकअप वापर. लीप कलर नॅचरल असू दे. ब्लॅक आयलायनर वापर. तुझ्या डोळ्यांच्या शेपला सजेसं असंच लायनर असू दे. आय श्ॉडो वापरू नकोस. काही व्रण किंवा पिंपल्स असतील तर क्लिन्झर वापर. हलका मेकअप उठावदार दिसेल.
तुला सूट होईल असा हेअरकट करून घे. कर्ल्स किंवा फ्लिक्स टाळ. क्लीन हेयरकट असू दे. बन बांध किंवा हाय पोनी बांध. केस मोकळे सोडणं टाळ. सोडलेस तरी ते मॅनेजेबल असू देत. एखादी लहान पिन किंवा क्लिप लावून त्यांना टक इन कर. ऑल द बेस्ट.
अनुवाद : प्राची परांजपे
viva.loksatta@gmail.com
प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘ठकाळ’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. चित्रपटांच्या वेशभूषा करण्याबरोबरच पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमित यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवा.