मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयात गेले आठवडाभर ‘डायमेन्शन’ या सास्कृतिक महोत्सवाची धूम सुरू आहे. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक महोत्सवात मुंबई-ठाण्यातील जवळपास ४० महाविद्यालये सहभागी झाली आहेत. पण, २१ आणि २२ डिसेंबर हे दिवस विशेष आकर्षणाचे ठरणार आहेत. २१ डिसेंबरला लोकनृत्य आणि फ्री स्टाईल नृत्य स्पर्धानी महोत्सवाची सुरुवात होईल. महोत्सवाच्या निमित्ताने  मराठी सुगम संगीत, स्वररचित काव्य-वाचन, अॅड फिल्म मेकिंग, बॉक्स क्रिकेट, रांगोळी, बुद्धीबळ आदी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत कॉपरेरेट, पारंपारिक वेशभुषा दिवस, व्यक्तिमत्त्व स्पर्धा, ग्रुप अलाईक डे साजरे करण्यात आले आहेत.