24 May 2016

स्त्री-भ्रूणहत्याविरोधात जागृतीसाठी प्रदर्शन

कुर्ला येथील अंजुमान ए इस्लामच्या मुलांच्या शाळेमध्ये मंगळवार २६ फेब्रुवारी रोजी स्त्री-भ्रूण हत्या, स्त्रियांवरील

प्रतिनिधी, मुंबई | February 26, 2013 12:52 PM

कुर्ला येथील अंजुमान ए इस्लामच्या मुलांच्या शाळेमध्ये मंगळवार २६ फेब्रुवारी रोजी स्त्री-भ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात जनजागृती व्हावी यासाठी एका प्रदर्शनाचे आयोजिन करण्यात आले आहे. एकेआय व वाय अँड एम समूह शाळेच्या सरचिटणीस फातिमा एच. अल्लाना या प्रमुख पाहुण्या असून इन्किलाब दैनिकाचे संपादक शाहिद लतिफ यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन दुपारी २.३० वाजता करण्यात येणार आहे.
डॉ. झहीर आय. काझी या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी असल्याचे या शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम साबिहा यांनी ेका पत्राद्वारे कळविले आहे. जी. ए. आर. शेख, गुलाम मोहम्मद पेशिमाम यांनीही या प्रदर्शनाला समाजातील सर्वांनी यावे असे आवाहन केले आहे.

First Published on February 26, 2013 12:52 pm

Web Title: exhibition for awareness on opposed of female feticide