नवी दिल्ली : हरियाणातील तीन अपक्ष आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर, बुधवारी भाजपकडून सरकार वाचविण्यासाठी खटपट सुरू झाली असून काँग्रेसनेही डावपेच खेळण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षांतील अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केला, तर काँग्रेस सरकार बनवणार असेल तर पाठिंबा देऊ, असे जननायक जनता पक्षाचे प्रमुख दुष्यंत चौताला यांनी जाहीर केले.

हरियाणामध्ये २५ मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार असताना राज्यात राजकीय साठमारी सुरू झाली आहे. अपक्ष आमदार सोम्बिर संगवान, रणधीरसिंह गोलन आणि धर्मपाल गोंदर यांनी मुख्यमंत्री नायबसिंह सैनी सरकारचा पाठिंबा मंगळवारी काढल्याने सरकार अल्पमतात आल्याचा दावा काँग्रेसने केला असून राज्यपालांना पत्र लिहून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. खट्टर सरकारमध्ये भाजपबरोबर असलेल्या चौताला यांनीही सैनी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. आम्ही पाठिंबा देऊ, आता काँग्रेसने निर्णय घ्यावा, असे चौताला म्हणाले. हरियाणाच्या ९० सदस्यांच्या विधानसभेमध्ये दोन सदस्य लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांनी राजीनामा दिल्याने ८८ सदस्य राहिले आहेत. बहुमताचा आकडा ४५ आहे. भाजपकडे ४० आमदार असून अन्य दोन अपक्ष व हरियाणा लोकहित पक्षाचे गोपाल कांडा यांचा पाठिंबा असल्याने ४३ संख्याबळ आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Supreme court Order on arvind Kejriwal interim bail tomorrow
केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर उद्या आदेश
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Malegaon blast case accused Lt Colonel (retd) Prasad S Purohit
Malegaon Blast: “हिंदुत्ववादी संघटनांची नावं घेण्यासाठी माझ्यावर दबाव होता”, आरोपी प्रसाद पुरोहितचा जबाब
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Ajit pawar on chandrakant patil statement about sharad pawar
‘शरद पवारांचा पराभव हवा’, चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर अजित पवारांची टीका; म्हणाले, “त्यांनी बारामतीत..”
rahul gandhi on modi adani ambani criticism
Video : “अदाणी-अंबानी पैसे देतात, हे तुम्हाला कसं माहिती?” पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आरोपाला राहुल गांधींचं प्रत्युत्तर
UK based drug maker AstraZeneca has recalled its global stock of the coronavirus vaccine
ॲस्ट्राझेन्काकडून कोविशिल्डचे साठे माघारी; दुष्परिणामांबाबत कबुलीनंतर कंपनीचे मोठे पाऊल

काँग्रेसकडे ३० आमदार असून बहुमतासाठी आणखी १५ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. जननायक जनता पक्षाचे १० आमदार असून तीन अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय लोकदलाचे अभय चौताला यांचाही काँग्रेसला पाठिंबा मिळू शकतो.