आयआयटीच्या पवई येथील संकुलात नवीन वर्षांच्या सुरुवातीला रणगाडे, विविध प्रकारच्या गन्स आदी युद्धसामग्री आणली जाणार आहे. निमित्त आहे ते वार्षिक तंत्रमहोत्सवाचे.
आयआयटी संकुलात २ ते ४ जानेवारी या कालावधीत पार पडणाऱ्या टेकफेस्टमध्ये यंदा संरक्षण दलाचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये तेथे येणाऱ्यांना रणगाडे, विविध प्रकारच्या बंदुका, युद्धनौका आणि पाणबुडय़ांच्या प्रतिकृती पाहावयास मिळणार आहेत. तंत्रमहोत्सवातील इतर तंत्रज्ञान दर्शविणाऱ्या प्रदर्शनांबरोबरच हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरणार आहे. या प्रदर्शनामध्ये यंदा संरक्षण खात्याच्या प्रदर्शनाबरोबरच विविध तंत्राविष्कार पाहता येणार आहे. याशिवाय आयआयटीमधील विविध विभागांनी केलेल्या संशोधनांची ओळख करून देणारे वेगळे प्रदर्शनही यामध्ये पाहावयास मिळणार आहे.
याशिवाय डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, विंट कर्फ सुभाष खोत, मंजुल भार्गव, रसेल पुकुट्टी आदी मान्यवरांची भाषणे होणार आहेत. भाषणांच्या वेळा आणि प्रदर्शनांच्या अतिरिक्त माहितीसाठी ँ३३स्र्://६६६.३ीूँऋी२३.१ॠ/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.