* मला रेनो क्विडच्या एएमटी व्हेरियन्टबाबत मार्गदर्शन करा. – सुधांशू गोरवाडकर

* रेनॉचे एएमटी व्हर्जन फक्त टॉप आरएक्सटी एक हजार सीसी मॉडेलमध्येच येते. त्यामुळे तिची किंमत जास्त आहे. त्या किमतीत तुम्ही सेलेरिओ किंवा वॅगन आर घ्यावी. ज्यांत तुम्ही मॅन्युअल मोडवरही गाडी चालवू शकाल.

* आमची पाच प्लस मुले अशी फॅमिली आहे. मात्र, त्यातील आम्ही दोघे पुण्यात राहतो आणि बाकीचे तिघे नांदेडमध्ये राहतात. त्या तिघांचे वर्षांतून दोन-तीनदा पुण्यात येणे होते. मला अशी कार घ्यायची आहे की, जी मला रोज ऑफिससाठीही वापरता येईल आणि ती घेऊन मी नांदेडला जाऊ शकेल अथवा तिकडची मंडळी इकडे आली तर त्यांना घेऊन फिरता येईल. माझे बजेट आठ-नऊ लाख रुपये आहे.

– दिलीप जाधव

* तुम्ही अर्टगिा ही कार पेट्रोल अथवा सीएनजी घ्यावी. जेणेकरून करून तुम्ही पुण्यातही फिरू शकता आणि बाकी कुठेही हायवेला वगरेसुद्धा जाऊ शकता. आणि तुम्ही जेव्हा पाच जण असाल तेव्हा सामानही नेऊ शकता. तर तुम्हाला योग्य अशी ही कार आहे.

* इकोस्पोर्ट किंवा ब्रेझामध्ये अँटिग्लेअर विण्डशिल्ड आहेत का? नसल्यास पर्याय काय आहे?

– जनू कोचरेकर

* तुम्हाला आताच्या गाडय़ांमध्ये टिल्टेड ग्लास मिळतात. त्या थोडय़ाफार प्रमाणात अँटिग्लेअर असतात; परंतु तरी तुम्हाला अधिक प्रमाणात पाहिजे असल्यास तुम्ही गरवारेचे विण्डशिल्ड लावून घ्यावे. त्याने उन्हाचा त्रासही कमी होतो. ते तुम्हाला सहा ते आठ हजारांत मिळेल.

* मला ऑटोमॅटिक कार घ्यायची आहे. मी व्ॉगन आर व्हीएक्सआय एएमटी किंवा सेलेरिओ एएमटी वा क्विड ईझीआर एएमटी या गाडय़ांचा विचार करतो आहे. मला कमी मेन्टेनन्सवाली, चांगला मायलेज देणारी अशी गाडी हवी आहे.

– विनय उर्तेकर

* वॅगन आर आणि सेलेरिओ यांच्यात फक्त डिझाइनचा फरक आहे. बाकी गिअरबॉक्स आणि इंजिन सारखेच आहेत. त्यामुळे तुम्हाला सेलेरिओ जास्त प्रशस्त वाटत असेल तर ती घ्यावी.

* माझा रोजचा प्रवास १५० किमीचा असतो. मी स्विफ्ट एलडीआय किंवा फोर्ड फिगो अँबिएंट या गाडय़ांचा विचार करतो आहे. मी नवीनच गाडी शिकलो आहे. कृपया मार्गदर्शन करा.

– संदीप शिंदे

* तुम्ही स्विफ्ट डिझेल ही गाडी घेऊ शकता, कारण ती दीर्घकाळासाठी चांगली आहे. मात्र, तुमचे बजेट थोडे जास्त असेल तर मी तुम्हाला फोक्सव्ॉगन पोलो वा व्हेंटो (डिझेल) या गाडय़ा सुचवेन. या गाडय़ांची इंजिने ताकदवान आहेत आणि मेन्टेनन्स कमी आहे. तुम्हाला एमयूव्ही घ्यायची असेल तर फोर्ड इकोस्पोर्ट घ्या. हायवेवर तिचा परफॉर्मन्स चांगला आहे.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com