scorecardresearch

आधार कार्ड Photos

आधार कार्ड म्हणजे काय [What is Adhar Card ]

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यंत आवश्यक असलेले ओळखपत्र आहे. या महत्त्वाच्या दस्तऐवजामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, वय लिंग आणि व्यवसाय यासंबंधित माहिती असते. भारत सरकारच्या आदेशानुसार आधार कार्डची निर्मिती केली जाते. आधार कार्ड हा भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे असे मानले जाते. भारत सरकार आणि आधार प्राधिकरण यंत्रणा यांच्या संयुगाने आधार कार्डची संकल्पना देशभरात राबवली गेली. भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड आवश्यक असते. कोणत्याही व्यक्तीला आधार कार्ड बनवून घ्यायचे असल्यास त्याला सर्वप्रथम अर्ज करावा लागतो. या दस्तऐवजामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेणे शक्य होते. शिवाय पेंशन योजना, बॅंक खाते, डिजिटल नोंदणी अशा अनेक सुविधा मिळतात. जर एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल, तर त्याला शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेता येणार नाही, ती व्यक्ती या योजनांपासून वंचित राहील.

आधार कार्ड हे १२ अंकी ओळखपत्र आहे. यामध्ये नमूद करण्यात आलेली त्या-त्या व्यक्तीची आरोग्य, शैक्षणिक पात्रता या संबंधित माहिती विविध ठिकाणी वापरली जाते. आधार कार्ड हा भारतीय असल्याचा सर्वात मोठा पुरावा आहे असे मानले जाते. याच्या मदतीने सरकारी योजनांचे फायदे उपभोगता येतात. व्यावसायिक, सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर आधार कार्ड या दस्ताऐवजाचा वापर केला जातो. बॅंकिंग, आयकर, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये आधार कार्डचे महत्त्वपूर्ण समजले जाते.


१.आधार कार्डचे पूर्ण नाव काय आहे? [What is the full name of Aadhar card?]

आधार कार्डचे विस्तृत स्वरुप ‘आधार नोंदणी क्रमांक’ (Aadhaar Enrollment Number – EID) असते. २८ अंकांचा समावेश असलेल्या या ओळखपत्रामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, जन्म तारीख अशा माहितीचा समावेश असतो. ही माहिती आधार कार्डच्या फॉर्ममार्फत मिळवली जाते.


२.मी माझे आधार कार्ड कसे तपासू शकतो? [How can I check my Aadhaar card? ]

आधार कार्ड तपासण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. यांमधील ऑनलाइन पद्धत ही सर्वात जास्त लोकप्रिय आहे. खाली दिलेल्या माहितीच्या आधारे आधार कार्ड तपासू शकता.

i>आधार कार्ड अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपासून घ्या. [ Check the Aadhaar card by visiting the official website ]

आधार कार्डसाठीच्या https://uidai.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा.
पुढे या डिजिटल पोर्टलवर जाऊन आधार नंबर, नाव आणि पिनकोड भरा.
भरलेली माहिती व्यवस्थापक वर्गाकडून तपासली जाते आणि यांच्या आधारे आधार कार्ड डाउनलोड करण्याच्या सल्ला दिला जातो.
(आधार पीडीएफ, आधार नंबर लिंक्ड मोबाइल फोनमध्ये आधार अ‍ॅप, आधार नंबर लिंक्ड डिजिटल वॉलेट)

ii>. आधार केंद्राला भेट द्या [Visit Aadhaar Card Centre]

आपल्या घराजवळच्या आधार केंद्राला भेट द्या.
केंद्रामध्ये जाऊन आधार नंबर, नाव आणि पिनकोड द्या.
त्या केंद्रातील कर्मचारी आधार कार्ड तपासले जाईल.

३.एखाद्या व्यक्तीकडे २ आधार कार्ड असू शकतात का? [Can a person have 2 Aadhaar cards?]

नाही. एखाद्या व्यक्तीकडे २ आधार कार्ड असू शकत नाही. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे एकच आधार कार्ड असू शकतो. आधार कार्डवरील नंबर हा यूनिक असतो. एका व्यक्तीसाठी एक ठराविक नंबर असतो. दोन आधार कार्ड एकत्र करणे, अस्थायी आधार कार्ड बनवणे किंवा आधार कार्डमधील माहिती हस्तांतरित करणे अशक्य असते. एकदा स्वत:चे आधार कार्ड तयार केल्यानंतर पुन्हा नवीन आधार कार्ड तयार करता येत नाही.


४.नावाने आधार कार्ड कसे मिळवायचे? [How to get Aadhar card by name?]

i>ऑनलाइन अर्ज करणे:

https://uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आधार कार्डची माहिती तपासू शकता.
आधार कार्डची ऑनलाइन नोंदणी https://resident.uidai.gov.in/ यावर जाऊन करु शकता.
अर्ज करण्याच्या प्रक्रियेत आधार कार्डची माहिती भरु शकता. पुढे संबंधित अन्य दस्तऐवज वापरण्यासाठी सुरु करु शकता.

ii>ऑफलाइन अर्ज करणे:

आपल्या घराजवळच्या आधार केंद्राला भेट द्या.
आधार कार्डसंबंधित अर्ज सादर करा आणि अन्य माहिती द्या.
जर तुमच्याकडे आधीच आधार कार्ड नंबर असेल, तर आधार कार्ड डाउनलोड करुन प्रिंट करु शकता.

५.मी मोबाइल नंबर वापरुन आधार कार्ड डाउनलोड करू शकतो का? [Can I download Aadhar card by mobile number?]

होय, आपण आपला आधार कार्ड मोबाइल क्रमांकाने डाउनलोड करू शकता. खालील पद्धतींचा पालन करा:

i>आधार डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाइलमध्ये “mAadhaar” अ‍ॅप डाउनलोड करा.
ii>अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, आपला आधार कार्ड असलेला मोबाइल नंबर वापरून रजिस्टर करा.
iii>नंबर रजिस्टर केल्यानंतर “Download Aadhaar” ऑप्शन निवडा. पुढे माहिती भरुन “Get OTP” या बटणावर टॅप करा.
iv>त्यानंतर नोंदणीकृत नंबरवर OTP पाठवला जाईल. स्क्रीनवरील बॉक्समध्ये OTP नंबर भरा.
v>असे केल्यानंतर आधार कार्डची PDF फाइल डाउनलोड करता येते.
vi>मोबाइल नंबर राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरुन लिंक केल्यानंतर मोबाइलमधील अ‍ॅपद्वारे आधार कार्ड मिळवता येते.

६.मी माझा आधार मोबाइल नंबर कसा बदलू शकतो? [How can I change my Aadhar mobile number?]

आधार कार्डमधील मोबाइल नंबर बदलण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

i> आधार केंद्रामध्ये जाऊन मोबाइल नंबर बदलून घेण्यासाठी अर्ज करा.

ii> ऑनलाइन पद्धतीने आधार कार्डमधील नंबर जोडण्यासाठी –
iii>आधार कार्डच्या वेबसाइटवर जाऊन “My Aadhaar” या बटणावर क्लिक करा.
iv> स्वत:चा आधार कार्ड नंबर टाइप करा.
v> त्यानंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP पाठवण्यात येईल, हा OTP स्क्रीनवर भरा.
vi> पुढे आधार कार्डच्या माहितीत नवीन मोबाइल नंबर टाका. अन्य माहिती भरुन “Submit” या बटणावर क्लिक करा.
vii>माहितीमध्ये बदल करुन सबमिट केल्यावर मोबाइल नंबरवर एक Confirmation code पाठवण्यात येईल.

७. मी १२ अंकी आधार क्रमांक कसा मिळवू शकतो? [How can I get 12 digit Aadhaar number?]

१२ अंकी आधार क्रमांक आधार कार्ड लिंकवरुन तपासू शकतचा. आधार क्रमांक मिळवण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करु शकता.

i>आधार कार्डच्या वेबसाइटवर जाऊन “My Aadhaar” या बटणावर क्लिक करा.
ii>त्यानंतर तेथे नाव, वडिलांचे नाव, पत्ता व अन्य माहिती भरा.
iii>एसएमएस किंवा ईमेलद्वारे व्हेरिफिकेशन कोड मिळवा.
iv>वेबसाइटवरील काही बेसिक प्रश्नांची उत्तरे देऊन आणि नियमांचे पालन करुन व्हेरिफिरेशन कोड मिळवता येतो.
v>त्यानंतर “Get OTP” या बटणावर क्लिक करा. असे केल्यानंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल.
vi> स्क्रीनवरील बॉक्समध्ये OTP टाकल्यावर १२ अंकी आधार क्रमांक स्क्रीनवर पाहायला मिळेल.
vii> आधार क्रंमाक मिळवण्यासाठी पूर्ण नाव, पत्ता, जन्म तारीख, ईमेल आणि मोबाइल नंबर यांची नोंदणी करावी लागते. जर आधार क्रमांक मिळाला नसेल तर आधार केंद्रामध्ये जाऊन तुम्ही आधार क्रमांक मिळवू शकता.

viii> आधार क्रमांक वेबसाइटवर शोधताना स्वत:चे संपूर्ण नाव, इतर माहिती तपासून घ्यावी.
जर तुमचा मोबाइल नंबर आधार कार्ड लिंकशी संलग्न असेल, तर आधार क्रमांक शोधताना व्हेरिफिकेशन कोड मिळवणे गरजेचे असते.

आधार केंद्रावर जाऊन नाव, पत्ता व अन्य माहिती दिल्यावर आधार क्रमांक मिळवू शकता.

८. मी माझे आधार कार्ड चित्र कसे बदलू शकतो? [How can I change my Aadhar card picture?]

ऑनलाइन पद्धतीने आधार कार्डमधील फोटो बदलता येतो. फोटो बदलून घेण्यासाठी मोबाइल नंबर किंवा ईमेल आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक असते. आधार कार्डमध्ये असणारा फोटो ऑनलाइन पद्धतीने बदलून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

i> वेब ब्राउझरवरुन https://resident.uidai.gov.in/offline-kyc / या वेबसाइटच्या लिंकवर जा.
ii> वेबसाइटवरील “Manage User Accounts for Offline Websign Any Aadhaar” हे ऑप्शन निवडा.
iii> आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर यांच्या आधारे व्हेरिफिकेशन कोड मिळवा.
iv> पुढे OTP ऑप्शनवर क्लिक करुन तो स्क्रीनवरील बॉक्समध्ये भरा.
v> त्यानंतर आधार कार्डवर जो फोटो लावायचा आहे, तो फोटो अपलोड करा.
vi> अपलोड केलेला फोटो आधार कार्डमध्ये संग्रहिक करण्यासाठी ”Submit” बटणावर क्लिक करा.

९. मी आधार कार्डमधील माझा फोटो किती वेळा बदलू शकतो? [ How many times can I change my photo in Aadhar card? ]

आधार कार्डमधील फोटो अनेकदा बदलता येतो. यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. खालील स्टेप्सच्या मदतीने तुम्ही आधार कार्डमधील फोटो बदलून घेऊ शकता.

i> आधार केंद्रावर जाऊन फोटो अपडेट करा. (आधार केंद्रावर जाऊन नवीन फोटो आणि फॉर्म तेथील अधिकाऱ्यांकडे सबमिट करावे.)
ii> ऑनलाइन पद्धतीने फोटो अपडेट करा. (आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फोटो बदलू शकता. iii>आधार क्रमांक आणि व्हेरिफिकेशन कोडच्या सहाय्याने वेबसाइटवर लॉग इन करु शकता.)
iv>mAadhaar अँप वापरुन फोटो अपडेट करा. ( mAadhaar अँप डाउनलोड करुन आधार कार्डमधील फोटो बदलून घेता येतो. याव्यतिरिक्त अन्य विस्तृत माहिती अपडेट करता येते.)

१०. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? Which documents required for Aadhar card update?

आधार कार्ड अपडेट करताना रेशन कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, बॅंकेचे पासबुक, क्रेडिट कार्ड आणि गॅस बिल अशा कागदपत्रांची गरज असते. ऑफलाइन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करताना आधार केंद्रामध्ये या कागदपत्रांचा एक सेट सबमिट करणे आवश्यक असते. या दस्तऐवजाद्वारे आधार केंद्रातील अधिकारी व्यक्तीची माहिती नीट तपासून घेतात. कागदपत्रांची सत्यता तपासल्यावर पुढे आधार कार्ड अपडेट केले जाते.

Read More
IDproofsofdeadperson
9 Photos
मृत व्यक्तीच्या आधार कार्ड, पासपोर्ट इत्यादि ओळखपत्रांचं काय करायचं? त्यांचा गैरवापर टाळण्यासाठी हे वाचा

केवळ आधार किंवा पॅनच नव्हे तर अशी बरीच कागदपत्र आणि ओळखपत्रं असतात जी बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडतात

Aadhaar-Card-data
9 Photos
Aadhaar Card: आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या’ चार पद्धती वापरा, सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहा

आधारच्या डेटाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांत फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तर तुम्ही या चार मार्गांनी तुमची आधार माहिती…

Aadhaar-
6 Photos
तुम्ही किती वेळा आधार कार्ड अपडेट करू शकता? जाणून घ्या

आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. त्याचा वापर बँकांपासून शाळा, महाविद्यालये, सरकारी-निमसरकारी कार्यालये आणि इतर ठिकाणी केला जातो.

ताज्या बातम्या