-
आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. त्याचा वापर बँकांपासून शाळा, महाविद्यालये, सरकारी-निमसरकारी कार्यालये आणि इतर ठिकाणी केला जातो. (संग्रहित फोटो)
-
आजही अनेकांकडे असलेले आधार कार्ड कागदीच आहे. या प्रकारचे आधार कार्ड खूप जपून ठेवावं लागतं. कागदी असल्यामुळे आधार कार्ड लवकर खराब होते. फाटणे किंवा पावसात भिजण्याची शक्यता असते. (संग्रहित फोटो)
-
तुमच्याकडे प्लॅस्टिकचे आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. हे आधार कार्ड तुमच्या एटीएम कार्डसारखेच आहे, ज्याला पीव्हीसी आधार कार्ड असेही म्हणतात. (संग्रहित फोटो)
-
तुम्हालाही तुमचे पीव्हीसी आधार कार्ड हवे असल्यास, या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही ते घरबसल्या मिळवू शकता. ज्यासाठी तुम्हाला ५० रुपये फी भरावी लागेल. (संग्रहित फोटो)
-
पीव्हीसी आधार कार्ड घरबसल्या मिळवण्यासाठी, तुम्हाला प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in/my-aadhaar/get-aadhaar.html ला भेट द्यावी लागेल. (संग्रहित फोटो)
-
तुम्हाला पेज खाली स्क्रोल करावे लागेल आणि तेथून Order Aadhar PVC Card चा पर्याय निवडावा लागेल. (संग्रहित फोटो)
-
तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल, सुरक्षा कोड भरा. आता खाली दिलेल्या Send OTP पर्यायावर क्लिक करा. (संग्रहित फोटो)
-
आता तुमच्या फोनवर एक OTP येईल, तो भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा तपशील तपासावा लागेल आणि सर्व माहिती बरोबर आल्यानंतरच पेमेंट करावे लागेल. (संग्रहित फोटो)
-
पेमेंटसाठी, तुम्ही UPI, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यापैकी कोणताही पर्याय वापरून तुमची फी भरू शकता. (संग्रहित फोटो)
-
एकदा तुम्ही पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला एक स्लिप मिळेल आणि तुमचे PVC आधार कार्ड स्पीड पोस्टद्वारे तुमच्या आधार कार्डवर नमूद केलेल्या पत्त्यावर काही दिवसांत वितरित केले जाईल. (संग्रहित फोटो)

VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण