scorecardresearch

अंजली दमानिया Videos

अंजली दमानिया (Anjali Damania) या भारतीय राजकारणी आहेत. २०१२ मध्ये त्यांनी आरटीआय कायद्याद्वारे कोंढाणे धरण प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणले. त्या आम आदमी पक्षाच्या सदस्या आणि प्रवक्त्या होत्या. याच काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) या दोन दिग्गज नेत्यांमध्ये व्यावसायिक संबंध असल्याचे आरोप केले. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरामधून लोकसभा निवडणूक लढवली. यात त्यांचा मोठा पराभव झाला.

२०१५ मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले. यामुळे त्यांनी आप पक्ष सोडला. पुढे त्यांनी छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse )यांच्या विरोधात अनेक जनहित याचिका दाखल केल्या. २०१६ मध्ये त्यांनी खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत अनिश्चित काळासाठी उपोषण केले. या प्रकरणामुळे एकनाथ खडसेंना नाईलाजाने राजीनाामा द्यावा लागला.
Read More

ताज्या बातम्या