Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

बिग बॉस Videos

बिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. बिग ब्रदर या डच शोपासून प्रेरणा घेत बिग बॉसची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी एकत्र येऊन बिग बॉसच्या घरामध्ये ठराविक दिवसांसाठी राहतात. त्यांना दर आठवड्याला काही टास्क दिले जातात. घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी त्यांचे चाहते ऑनलाइन पद्धतीने वोट करत असतात. सर्वात कमी वोट्स असलेला स्पर्धक या कार्यक्रमातून बाहेर पडतो. बिग बॉसच्या घरामध्ये असंख्य कॅमेरे पाहायला मिळतात. हे कॅमेरे २४ तास घरातील स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. शेवटी उरलेल्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक या शोचा विजेता ठरतो आणि त्याला ठराविक रक्कम व अन्य गोष्टी बक्षीस म्हणून मिळतात. २००६ मध्ये भारतातील पहिला बिग बॉस शो हिंदी भाषेमध्ये सुरु झाला. पुढे कन्नड, तेलुगू, तमिळ, मराठी, बांग्ला, मल्याळम अशा भाषांमध्येही बिग बॉस शोचे आयोजन करण्यात आले. सलमान खानने हिंदी बिग बॉसच्या सर्वाधिक पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे. सलमान प्रमाणे त्या-त्या भाषिक चित्रपटांमधील सुपरस्टार्स बिग बॉसच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. उदा. मराठी बिग बॉस – महेश मांजरेकर, तमिळ बिग बॉस – कमल हासन, मल्याळम बिग बॉस – मोहनलाल.Read More
Manisha Kayandes allegation on Bigg Boss OTT program
Manisha Kayande: “त्यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत”; मनिषा कायंदेंचा बिग बॉस ओटीटी कार्यक्रमावर आरोप

“बिग बॉसमध्ये अश्लील चित्रीकरण दाखवले जात आहे. त्यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत.”, असा आरोप मनिषा कायंदे यांनी केला आहे. या प्रकरणी…

Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui: "मी नशीबवान आहे", ‘बिग बॉस' जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीचं विधान
Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui: “मी नशीबवान आहे”, ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीचं विधान

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ‘बिग बॉस १७’ चा विजेता ठरला आहे. ऑक्टोबरमध्ये सुरू झालेलं बिग बॉसचं १७ वं पर्व २८…

ताज्या बातम्या