scorecardresearch

चेतेश्वर पुजारा News

चेतेश्वर पुजारा हा भारतीय फलंदाज आहे. त्याचा जन्म २५ जानेवारी १९८८ रोजी गुजरातमधील राजकोट येथे झाला. त्याचे वडील अरविंद पुजारा आणि काका बिपीन पुजारा हे दोघे सौराष्ट्रकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळले होते. वडिलांप्रमाणे चेतेश्वर पुजारा देखील सौराष्ट्र संघाकडून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. २००५ मध्ये पुजाराने इंग्लंडविरुद्ध भारताकडून अंडर-१९ कसोटी फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. या सामन्यामध्ये त्याने २११ धावा केल्या. पुढे २००६ च्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेत पुजारा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. शिवाय तो सामनावीर देखील ठरला होता.


२००५ पासून चेतेश्वर पुजारा सौराष्ट्र संघाकडून क्रिकेट खेळत आहे. २०१० मध्ये पुजाराने आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. पुढे २०१३ मध्ये त्याला भारताकडून एकदिवसीय सामना खेळायची संधी मिळाली. राहुल द्रविड आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची कसोटी संघातील जागा भरुन काढण्याचे काम पुजारा करत आहे. २०१२ मध्ये त्याने कमबॅक करत न्यूझीलंड विरुद्ध सामन्यामध्ये शतकीय कामगिरी केली. त्याच वर्षी त्याने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात २०० धावा केल्या. २०१३ मध्ये पुन्हा २०० धावा करत त्याने सलामीवीरपद पटकावले. २०११ पासून ते आत्तापर्यंत चेतेश्वर पुजारा भारतीय कसोटी संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू मानला जात आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये बरेचदा तो आऊट ऑफ फॉर्म देखील होता पण तो पुन्हा-पुन्हा कमबॅक करत असल्याचे पाहायला मिळते.


आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय क्रिकेटस्पर्धांसह पुजारा कौंटी क्रिकेट देखील खेळतो. त्याच्याकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभवही आहे. २०१० मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सचा सदस्य होता. पुढे २०११-१३ मध्ये पुजारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला. २०१४ च्या आयपीएलमध्ये पुजाराला पंजाब टीममध्ये घेण्यात आले. २०१५ ते २०२० या पाच वर्षांमध्ये तो आयपीएलमध्ये सहभागी झाला नव्हता. २०२१ मध्ये चेन्नई सुपरकिंग्सने त्याच्यावर बोली लावत संघात घेतले. लवकरच सुरु होणाऱ्या आशिया कप २०२३ साठीच्या भारतीय संघामध्ये चेतेश्वर पुजाराची निवड करण्यात आली आहे. निवडकर्तांना त्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. त्याच्या कामगिरीवर कसोटी संघातील त्याच्या स्थान अवलंबून आहे.


Read More
Cheteshwar Pujara Cryptic Post About Joining Chennai Super Kings
IPL 2024: चेतेश्वर पुजारा चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात सामील होणार? पुजाराच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ

Cheteshwara Pujara Tweet: चेतेश्वर पुजाराच्या ट्विटने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. पुजाराने मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यापूर्वी ही…

Rajat Patidar fails against England Test series
IND vs ENG : रजत पाटीदारवर निवड समिती मेहेरबान का? मालिकेतील खराब प्रदर्शनानंतर चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित

Rajat Patidar fails in Test series : रजत पाटीदारला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करता आलेली नाही. तो इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या…

Ranji Trophy 2024 Quarter Final Updates in Marathi
Ranji Trophy : तामिळनाडूची उपांत्य फेरीत धडक! पुजाराची झुंज अपयशी, आंध्र प्रदेशला विजयासाठी ७५ धावांची गरज

TN qualify for the semifinals : तामिळनाडूने सौराष्ट्राचा एक डाव आणि ३३ धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ…

Mumbai vs Baroda, 2nd Quarter Final Updates in marathi
Ranji Trophy 2024 : मुशीर खानने रणजीत झळकावले पहिले शतक, पुजारा-रहाणे ठरले अपयशी

Musheer Khan’s century : १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या मुशीर खानने या रणजी हंगामातील पहिल्याच सामन्यात शतक झळकावले.…

Cheteshwar Pujara signaled his return to Team India with a brilliant century against Manipur
Ranji Trophy 2024 : चेतेश्वर पुजाराने ‘बॅझबॉल’ शैलीत झळकावले दमदार शतक, टीम इंडियात परतण्याचे दिले संकेत

Cheteshwar Pujara’s century : चेतेश्वर पुजारा रणजीमध्ये सातत्याने धावा करत आहे. तो रणजीच्या माध्यमातून कसोटी संघात पुनरागमन करण्याची वाट पाहत…

What the selectors think doesn't matter at all to his batting Mohammad Kaif makes a big statement about Cheteshwar Pujara
IND vs ENG: “निवडकर्त्यांना जे वाटते त्याचा परिणाम…” मोहम्मद कैफने चेतेश्वर पुजाराबाबत केले सूचक विधान

IND vs END: मोहम्मद कैफने भारतीय कसोटी संघाबाहेर असलेल्या चेतेश्वर पुजाराचा बचाव केला आहे. या माजी क्रिकेटपटूने निवडकर्त्यांवरही ताशेरे ओढले.

Cheteshwar Pujara's Double Century
SAU vs JHA : कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होण्यापूर्वी चेतेश्वर पुजाराचा धमाका, रणजीत झळकावले द्विशतक

Cheteshwar Pujara Double Century : चेतेश्वर पुजाराने झारखंडविरुद्धच्या रणजी सामन्यात सौराष्ट्रकडून द्विशतक झळकावले. त्याच्या या खेळीमुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत…

Saurashtra vs Jharkhand Match Updates in marathi
Ranji Trophy 2024 : चेतेश्वर पुजाराचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, सौराष्ट्रकडून खेळताना झळकावले शानदार अर्धशतक

Saurashtra vs Jharkhand Match Updates : चेतेश्वर पुजाराने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. राजकोटमध्ये त्याने सौराष्ट्रसाठी दमदार फलंदाजी केली आहे.

Harbhajan Singh Raise Question on Team India defeat
IND vs SA : ‘कसोटी क्रिकेटमध्ये ‘या’ खेळाडूपेक्षा चांगला फलंदाज आमच्याकडे नाही’, भारताच्या पराभवावर हरभजन सिगची प्रतिक्रिया

Harbhajan Singh Raise Question : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताचा एक…

IND vs SA: Pujara-Rahane out Rituraj also injured This young player will get a chance in Team India in the first Test
IND vs SA: पुजारा-रहाणे नाही, ऋतुराजही दुखापतग्रस्त; पहिल्या कसोटीत टीम इंडियात ‘या’ युवा खेळाडूला मिळणार संधी

IND vs SA Test Series: ऋतुराजने एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही सामन्यांमध्ये पदार्पण केले आहे, परंतु अद्याप कसोटीत एकही सामना…

IND vs SA: Break on the golden careers of Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara Leave from Test team also
IND vs SA: पुजारा-रहाणेची कारकीर्द संपली? दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून पत्ता कट झाल्याने सोशल मीडियात चर्चेला उधाण

IND vs SA: भारताने शेवटची कसोटी जुलै महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये खेळली होती. त्यानंतर टीम इंडिया दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कॅरेबियन…