Mumbai vs Baroda 2nd Quarter Final Updates : १९ वर्षाखालील विश्वचषक २०२४ मध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या मुशीर खानने रणजी ट्रॉफीमध्येही शानदार कामगिरी केली आहे. मुशीरने २०२२ च्या अखेरीस मुंबईसाठी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण पहिल्या तीन सामन्यात केवळ ९२ धावा करणाऱ्या मुशीरने रणजी ट्रॉफीतील पुनरागमन सामन्यात शतक झळकावले आहे. बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईचे दिग्गज फलंदाज एकापाठोपाठ एक अशा कठीण विकेटवर बाद होत होते. मात्र मुशीरने शतक झळकावून संघाला अडचणीतून बाहेर काढले.

मुशीरचे देशांतर्गत क्रिकेटमधील पहिले शतक –

देशांतर्गत क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमधील मुशीर खानचे हे पहिले शतक आहे. त्याने १७९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मुशीरने आपल्या शतकी खेळीत ६ चौकार लगावले. पृथ्वी शॉने मुंबईला वेगवान सुरुवात करून दिली. पृथ्वी ५७ धावांवर बाद झाल्यानंतर मुशीर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. लवकरच मुंबईची धावसंख्या ९९ धावांवर ५ बाद वरु १४२ धावांवर ५ विकेट अशी झाली. फिरकी गोलंदाजांसाठी खेळपट्टी उपयुक्त होती.

Gautam Gambhir Argument With Umpire
KKR vs PBKS : पंजाबविरुद्धच्या सामन्यात गौतम गंभीर संतापला, लाइव्ह मॅचदरम्यान अंपायरशी भिडला, VIDEO व्हायरल
Royal Challengers Bangalore Vs Kolkata Knight Riders Match Highlights in Marathi
KKR vs RCB : रोमहर्षक सामन्यात केकेआरचा आरसीबीवर एका धावेने निसटता विजय, विल जॅक्सची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Top 5 Oldest Player To Score A Century In IPL
IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?

अजिंक्य रहाणे पुन्हा अपयशी ठरला –

सामन्याच्या पहिल्या डावात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. रहाणे १३ चेंडूत ३ धावा करून बाद झाला. पृथ्वी शॉने ३३ धावांची खेळी केली. १४२ धावांवर ५ विकेट पडल्यानंतर हार्दिक तमोरने मुशीरला साथ दिली. त्यामुळे मुंबई संघाला पहिला दिवसअखेर ९० षटकानंतर ५ बाद २४८ धावा केल्या. सध्या मुशीर खान २१६ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १२८ धावांवर नाबाद आहे. त्याचबरोबर हार्दिक तमोरने १६३ चेंडूत ३० धावांवर नाबाद आहे.

हेही वाचा – AUS vs NZ : मॅक्सवेलने फिंचचा विक्रम मोडत रचला इतिहास, ऑस्ट्रेलियासाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

सौराष्ट्रसाठी सर्वाधिक धावा करणारा पुजारा उपांत्यपूर्व फेरीत अपयशी –

अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. तामिळनाडूविरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सामन्यात त्याला केवळ दोन धावा करता आल्या. मात्र, सौराष्ट्रसाठी पुजारा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १२ डावात ७८३ धावा केल्या आहेत. पुजाराची सर्वोच्च धावसंख्या २४३ धावा आहे. त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके केली आहेत. पुजारा सध्या भारतीय संघाबाहेर आहे. सौराष्ट्राने हार्विक देसाईच्या ८३ धावांच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात तमिळनाडूने पहिल्या दिवसअखेर १ बाद २३ धावा केल्या.

अथर्व तायडेच्या शतकाने विदर्भाची चांगली सुरुवात –

नागपुरात खेळल्या जात असलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत अथर्व तायडेच्या शतकाच्या (१०९) बळावर विदर्भाने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या डावात ३ बाद २६१ धावा केल्या. अथर्वशिवाय वायव्ही राठोडने ९३ धावांची खेळी खेळली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १८४ धावांची मोठी भागीदारीही केली. कर्नाटककडून विदावथा कावरप्पा, हार्दिक राज आणि कौशिक व्ही यांनी १-१ विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs ENG : जो रुटच्या शतकी खेळीने इंग्लंडला सावरलं, भारताच्या आकाश दीपने पदार्पणातच घेतल्या तीन विकेट्स!

मध्य प्रदेशचा डाव अडखळला –

चौथ्या उपांत्यपूर्व फेरीत मध्य प्रदेश क्रिकेट संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात ९ गडी गमावून २३४ धावा केल्या आहेत. मध्य प्रदेशकडून यश दुबे (६४) आणि हिमांशू मंत्री (४९) या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. मात्र, संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी सातत्याने विकेट गमावल्या. आंध्र प्रदेशसाठी केव्ही शशिकांत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ३७ धावा देत ४ बळी घेतले.