scorecardresearch

गुढीपाडवा २०२४ News

गुढी पाडवा (Gudi Padwa) या सणाने हिंदू नववर्षाची सुरुवात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर येणारा हा सण महाराष्ट्रभर आनंदामध्ये साजरा केला जातो. गुढी पाडव्याला सर्वजण पहाटे लवकर उठतात. अंघोळ करुन सूर्योदय झाल्यानंतर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते. त्यावर फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते.

गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो आणि तयार केलेली गुढी दारामध्ये लावली जाते. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. गुढी पाडव्याच्या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मोठमोठ्या ठिकाणी शोभायात्रा निघतात. गिरणगाव/ गिरगाव हे शोभायात्रासाठी फार प्रसिद्ध आहे. या वर्षी गुढी पाडवा ०९ एप्रिल रोजी आहे.
Read More
Gudi Padwa Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला बाजारात उत्साह, ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी

सोने, चांदीचे विक्रमी दर असतानाही नागपूरकरांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी शहरातील विविध सराफा व्यावसायिकांकडे गर्दी केली.

Raj Thackeray Gudi Padwa Melava 2024 Marathi News
MNS Gudi Padwa Melava: “मला शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असतं तर..”, राज ठाकरेंनी ‘त्या’ चर्चेवर मांडली भूमिका

Raj Thackeray Gudi Padwa Melava 2024 : राज ठाकरेंनी आज मेळाव्यात गुढीपाडव्याच्या निमित्त सगळ्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा

नवी मुंबई शहरात सकाळपासून स्वागतयात्रा निघत होत्या. मात्र मोठ्या आणि प्रमुख समजल्या जाणाऱ्या शोभायात्रा सकाळी साडेदहानंतर निघाल्या.

Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई

गुढीपाडव्यानिमित्त शहरातून मंगळवारी सकाळी दुचाकी यात्रा काढून नववर्षाचे चैतन्यमय वातावरणात स्वागत केले.

Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश

पनवेल शहरामध्ये मंगळवारी सकाळी गुढीपाडवा म्हणजेच नववर्ष स्वागत शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून ऐक्याचा संदेश देण्यात आला. यंदाचे नववर्ष स्वागत यात्रेचे…

raj thackeray mns padwa melawa
फडणवीस म्हणतात “पाठिंब्याची अपेक्षा”; महायुतीच्या नेत्यांची सकारात्मक विधानं, पण राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय?

“राज ठाकरे नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे”, अशी सूचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

cm eknath shinde gudhi padwa
“जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!

मुख्यमंत्री म्हणाले, “आधीच्या सरकारमध्ये अडीच वर्षांत सर्व सण-उत्सव बंद होते. पण आपलं सरकार आल्यानंतर सणांप्रमाणेच विकासावरचीही बंधनं उठवली”

Gudi Padwa 2024 Wishes messages and quotes in Marathi
Gudi Padwa 2024: गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज

Gudi Padwa 2024 Wishes: तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज…

jejuri marathi news, two lakh pilgrims jejuri marathi news
जेजुरीच्या सोमवती यात्रेस दोन लाख भाविक, शालेय परीक्षा व पाडवा सणाचा यात्रेवर परिणाम

साऱ्या महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेस सुमारे दोन लाख भाविकांनी गर्दी केली होती.

ताज्या बातम्या