scorecardresearch

गुढीपाडवा २०२४ Videos

गुढी पाडवा (Gudi Padwa) या सणाने हिंदू नववर्षाची सुरुवात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर येणारा हा सण महाराष्ट्रभर आनंदामध्ये साजरा केला जातो. गुढी पाडव्याला सर्वजण पहाटे लवकर उठतात. अंघोळ करुन सूर्योदय झाल्यानंतर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते. त्यावर फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते.

गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो आणि तयार केलेली गुढी दारामध्ये लावली जाते. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. गुढी पाडव्याच्या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मोठमोठ्या ठिकाणी शोभायात्रा निघतात. गिरणगाव/ गिरगाव हे शोभायात्रासाठी फार प्रसिद्ध आहे. या वर्षी गुढी पाडवा ०९ एप्रिल रोजी आहे.
Read More

ताज्या बातम्या