Marathi New Year and Gudi Padwa 2024 Wishes: देशात विशेषत: महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा होतो. यावर्षी गुढीपाडवा म्हणजेच, मराठी नववर्ष मंगळवार, ९ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. मराठी घरांमध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुढी उभारली जाते. राज्यातील लोक गुढीपाडवा त्यांच्या घरांची सजावट करून, घरी स्वादिष्ट अन्नपदार्थ, गोडधोड बनवून आणि कुटुंबातील सदस्यांसह विशेष विधी करून गुढीच्या सजावटी बरोबरच परिसरात रंगीबेरंगी रांगोळी काढून साजरे करतात, यामुळे सर्वत्र वातावरण चैतन्यमय राहते. या मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही आपल्या प्रियजन आणि कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही दिलेले शुभेच्छा संदेश व व सुंदर ग्रीटिंग्स  WhatsApp, FB, Instagram, अशा सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करुन त्यांना शुभेच्छा देऊ शकता.

गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या खास मराठीतून द्या शुभेच्छा!

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
औचित्य शुभ मुहूर्ताचे करूनी
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

पडता दारी पाऊल गुढीचे
आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे
नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
सुरुवात करु नवीन क्षणांची
नव वर्षाच्या शुभेच्छा!

नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ
नवीन आशा नववर्षाची,
नविन सकाळ, सुंदर विचार,
गुढीपाडवा व नुतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

अशाप्रकारे तुम्ही आपल्या प्रिजयनांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता.