scorecardresearch

हिंदी मूव्ही Photos

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला हिंदी चित्रपटांबाबत (Hindi Movie) माहिती मिळेल. हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलीवूड या नावानेदेखील ओळखले जाते. हिंदी चित्रपटसृष्टी मुंबई शहरात वसलेली आहे. हे चित्रपट भारतासह जगभरातील विविध देशांमध्ये प्रदर्शित होतात.


हिंदी चित्रपटांमध्ये अनेक गीते आणि नृत्येही असतात. प्रेम, देशभक्ती, कुटुंब, भयपट, कॉमेडी अशा विविध विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होतात. हिंदी चित्रपटसृष्टी जगभरातील सर्वांत मोठ्या केंद्रांपैकी एक आहे.

बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्यांची संख्या आणि निर्मित केल्या जाणाऱ्या चित्रपटांची संख्या पाहता ही जगभरातील सर्वात मोठी चित्रपट उद्योगांपैकी एक आहे हे स्पष्ट होते.१९९५ मध्ये लिमियर ब्रदर्सने पॅरिस सलूनच्या सभा भवनमध्ये प्रदर्शित केलेला पहिला चित्रपट म्हणजे ‘इंजिन ट्रेन’. याच लिमियर ब्रदर्सने ७ जुलै १८९६ मध्ये मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये चित्रपटाचा पहिला शोदेखील प्रदर्शित केला होता. प्रतिव्यक्ती एक रुपया प्रवेश शुल्क भरून, मुंबईतील उच्चभ्रू लोकांनी या शोचे स्वागत केले. त्या दिवशी भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म झाला.


राजा हरिश्चंद्र (१९१३) भारतामध्ये तयार होणारा पहिला हिंदी चित्रपट होता; जो दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट लवकरच भारतात लोकप्रिय झाला. १९३० पर्यंत वर्षाला सुमारे २०० चित्रपट बनवले जात होते. अर्देशीर इराणी यांनी बनवलेला आलम आरा हा पहिला बोलपट होता. हा चित्रपट खूप गाजला होता. कालांतराने हिंदी चित्रपटसृष्टीची वेगाने प्रगती झाली आणि एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट प्रदर्शित झाले. येथे तुम्हाला हिंदी चित्रपटांशी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर मिळेल. कोणते नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत? चित्रपटामध्ये कोण अभिनेता आणि अभिनेत्री आहेत? चित्रपटाचे परीक्षण, तसेच दिग्गज अभिनेते, गायक, दिग्दर्शक यांचे हिंदी चित्रपटसृष्टीमधील योगदान अशी सर्व माहिती येथे तुम्हाला मिळू शकते.


Read More
9 Photos
Shraddha Murder Case: डेटिंग अ‍ॅपवरुन मैत्री ते Dexter बघून मृतदेहाचे ३५ तुकडे…हे प्रकरण ‘या’ हिंदी चित्रपटांची आठवण करून देईल

Shraddha Murder Case: आफताब पूनावालाने Dexter बघून श्रद्धाचे केले ३५ तुकडे, ‘हे’ बॉलीवूड चित्रपट तुम्हाला या प्रकरणाची आठवण करून देईल

World Mental Health Day 2022
12 Photos
World Mental Health Day 2022: आलियाचा डिअर जिंदगी , सुशांतचा छिछोरे…मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणारे ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

आज जागतिक मानसिक आरोग्यदिनी जाणून घेऊया अशा चित्रपटांबद्दल, जे तुम्हाला नक्की पाहिले पाहीजेत.

cirkus movie, ganpat movie,
9 Photos
एकाचवेळी प्रदर्शित होणार बॉलिवूडचे ‘हे’ बिग बजेट चित्रपट, दाक्षिणात्य चित्रपटांचा मोडणार रेकॉर्ड?

यंदा ख्रिसमसच्या ऐन मोक्यावर बॉलिवूडमधील बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. बॉक्सऑफिसवर हे चित्रपट कितपत कमाई करणार हे पाहणं औत्सुक्याचं…

Prithviraj trailer, Prithviraj movie trailer,
9 Photos
बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटामधील ‘हे’ आहेत दमदार डायलॉग, काही तासांमध्येच लाखो लोकांनी पाहिला ट्रेलर

अभिनेता अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरचा बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. याच ट्रेलरमधील संवादांना सध्या प्रेक्षकांची अधिक…

9 Photos
Photos : कोणतंही सब्सक्रिप्शन न घेता OTT वर फ्रीमध्ये पाहू शकता अभिनेते धर्मेंद्र यांचे ‘हे’ सात सुपरहिट चित्रपट

धर्मेंद्र यांच्या ७ चर्चित सुपरहिट चित्रपटांचा आढावा. तुम्ही हे चित्रपट एमएक्स प्लेयरवर कोणतंही सब्सक्रिप्शन न घेता मोफत पाहू शकता.

bollywood movies on gangster
24 Photos
Photos : ‘गंगुबाई काठियावाडी’ ते ‘हसीना पारकर’…माफियांवर आधारित असलेले बॉलिवूडमधील चित्रपट

वास्तविक जीवनातील गँगस्टर आणि माफियांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये बनवले गेले आहेत.