६९ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा रविवारी (२८ जानेवारी रोजी) गुजरातमधील गांधीनगर येथे पार पडला. या सोहळ्याला अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. बॉलीवूडचे पॉवर कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी या सोहळ्यात पुरस्कार पटकावले. या सोहळ्यात २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांतील विविध नामांकनासाठी कालाकारांना पुरस्कारांनी गौरविण्यात आलं.
संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘ॲनिमल’ चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. तर आलिया भट्टने करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.
विक्रांत मेस्सी याला ‘ट्वेल्थ फेल’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) हा पुरस्कार मिळाला. तर, दुसरीकडे राणी मुखर्जी हिला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ आणि शेफाली शाहला ‘थ्री ऑफ अस’ या चित्रपटांमधील कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हेही वाचा… Bigg Boss 17 : महाअंतिम सोहळ्यात अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा रोमँटिक डान्स, व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा… VIDEO: प्रियांका चोप्राच्या पतीचं भारतात जोरदार स्वागत! निक जोनासला पाहताच चाहते म्हणाले, “जीजू…”
६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन चित्रपट निर्माता करण जोहर, अभिनेता आयुष्मान खुराना व टीव्ही होस्ट मनीष पॉल या तिघांनी मिळून केलं. नृत्य, संगीत, विनोदी स्किट्स आणि मनोरंजनाने परिपूर्ण हा सोहळा उत्तमरित्या पार पडला.
६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार, २०२४ च्या विजेत्यांची संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट : ट्वेल्थ फेल
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : विधू विनोद चोप्रा – ट्वेल्थ फेल
प्रमुख भूमिका, सर्वोत्कृष्ट अभिनेता : रणबीर कपूर – ॲनिमल
प्रमुख भूमिका, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट – रॉकी और रानी की प्रेम कहानी
सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) : ‘जोराम’ (देवाशिष माखिजा)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) : विक्रांत मेस्सी- ट्वेल्थ फेल
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) : राणी मुखर्जी – मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे, शेफाली शाह – थ्री ऑफ अस
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : विकी कौशल – डंकी
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : शबाना आझमी – रॉकी और रानी की प्रेम कहानी
सर्वोत्कृष्ट गीत : अमिताभ भट्टाचार्य – ‘तेरे वास्ते’ – जरा हटके जरा बचके
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम : ॲनिमल (प्रीतम, विशाल मिश्रा, मनन भारद्वाज, श्रेयस पुराणिक, जानी, भूपिंदर बब्बल, आशिम केमसन, हर्षवर्धन रामेश्वर, गुरिंदर सीगल)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : भूपिंदर बब्बल – (अर्जन वेल – ॲनिमल)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : शिल्पा राव (“बेशरम रंग” – पठान)
सर्वोत्कृष्ट कथा : अमित राय (ओएमजी २), देवाशीष माखिजा (जोरम)
सर्वोत्कृष्ट पटकथा : विधू विनोद चोप्रा (ट्वेल्थ फेल)
सर्वोत्कृष्ट संवाद : इशिता मोईत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोअर : हर्षवर्धन रामेश्वर (ॲनिमल)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : अविनाश अरुण धावरे (थ्री ऑफ अस)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन : सुब्रत चक्रवर्ती, अमित रे (सॅम बहादूर)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा : सचिन लवळेकर, दिव्या गंभीर, निधी गंभीर (सॅम बहादूर)
सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन : कुणाल शर्मा (एमपीएसई), (सॅम बहादूर), सिंक सिनेमा (ॲनिमल)
सर्वोत्कृष्ट संपादन : जसकुंवर सिंग कोहली – विधू विनोद चोप्रा (ट्वेल्थ फेल)
सर्वोत्कृष्ट कृती : स्पिरो रझाटोस, ए एन एल अरासू, क्रेग मॅक्रे, यानिक बेन, केचा खामफकडी, सुनील रॉड्रिग्ज (जवान)
सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स : रेड चिलीज व्हीएफएक्स (जवान)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : गणेश आचार्य (“व्हॉट झुमका?” – रॉकी और रानी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक : तरुण दुडेजा (धक धक)
सर्वोत्कृष्ट पदार्पण -अभिनेता: आदित्य रावल (फराज)
सर्वोत्कृष्ट पदार्पण – अभिनेत्री: अलिझेह अग्निहोत्री (फॅरी)
जीवनगौरव पुरस्कार : डेव्हिड धवन