
रणवीर सिंगची मुख्य भूमिका असणारा ‘सर्कस’ चित्रपट २३ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

रोहित शेट्टीने या मल्टीस्टारर चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉनची मुख्य भूमिका असणारा ‘गणपत’ चित्रपटही २३ डिसेंबरलाच बॉक्सऑफिसवर दाखल होणार आहे.

हा एक एक्शन थ्रिलर चित्रपट आहे. क्रिती देखील या चित्रपटात जबरदस्त एक्शन सीन्स करताना दिसणार आहे.

कतरिना कैफची मुख्य भूमिका असणारा ‘मेरी क्रिसमस’ चित्रपट देखील क्रिसमसच्या ऐनमोक्यावर चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.

या चित्रपटात कतरिनाची एक वेगळीच भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

‘कभी ईद कभी दिवाली’ हा सलमान खानचा चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

त्याशिवाय सलमानचे इतरही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.

एकाच वेळी प्रदर्शित होणारे बॉलिवूडचे हे बिग बजेट चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटांचा रेकॉर्ड मोडणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (फोटो – सगळे फाईल फोटो)