Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

मुरलीधर मोहोळ Photos

कुस्तीच्या आखाड्यात मैदान गाजवत असतानाच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार झाले आहेत. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे. कसलेला पैलवान ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास ठरला आहे. मोहोळ कुटुंबाला कुस्तीची पार्श्वभूमी आहे. आजोबा, वडील, काका, थोरले बंधू पैलवान असल्याने मुरलीधर मोहोळ यांनीही शिक्षणाबरोबरच कुस्तीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली.

कोल्हापुरातील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते परतले आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन त्यांचा पुण्याच्या राजकारणात १९९३ च्या सुमारास प्रवेश झाला. सन २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या वर्षी त्यांनी सलग चार वेळा नगरसेवकपद भूषविले. भाजपची पुणे महापालिकेत स्वबळावर सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले, तर २०१९ ते २०२२ या कालावधीत त्यांना महापौरपदाची जबाबदारी मिळाली.


Read More
murlidhar mohol met raj thackeray
9 Photos
PHOTOS : केंद्रीय मंत्रीपदी बसल्यानंतर मुरलीधर मोहोळ शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला! पाहा फोटो

खासदार आणि केंद्रीय मंत्री झाल्यांनतर पहिल्यांदाच मुरलीधर मोहोळ यांनी राज ठाकरेंची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. (सर्व फोटो- मुरलीधर मोहोळ…

lok-sabha-election-2024-result-pune-murlidhar-mohol
12 Photos
Photos: गुलाल, फटाके अन् बरंच काही; मुसळधार पावसातही कार्यकर्त्यांनी ‘असा’ साजरा केला मुरलीधर मोहोळ यांचा विजय

पुण्यातील जनतेचा कौल स्पष्ट झाला आहे. पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी झाले आहेत.

ताज्या बातम्या