Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

मुरलीधर मोहोळ Videos

कुस्तीच्या आखाड्यात मैदान गाजवत असतानाच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार झाले आहेत. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे. कसलेला पैलवान ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास ठरला आहे. मोहोळ कुटुंबाला कुस्तीची पार्श्वभूमी आहे. आजोबा, वडील, काका, थोरले बंधू पैलवान असल्याने मुरलीधर मोहोळ यांनीही शिक्षणाबरोबरच कुस्तीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली.

कोल्हापुरातील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते परतले आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन त्यांचा पुण्याच्या राजकारणात १९९३ च्या सुमारास प्रवेश झाला. सन २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या वर्षी त्यांनी सलग चार वेळा नगरसेवकपद भूषविले. भाजपची पुणे महापालिकेत स्वबळावर सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले, तर २०१९ ते २०२२ या कालावधीत त्यांना महापौरपदाची जबाबदारी मिळाली.


Read More
Citizens expressed their anger due to water damage in the river Muralidhar Mohol gave a reaction
Pune:”नदी पात्रातील पाण्यामुळे नुकसान झाले”, नागरिकांनी व्यक्त केला संताप; मुरलीधर मोहोळ म्हणाले…

पुणे शहरातील सिंहगड रोडवरील एकतानगर आणि निंबजनगर भागातील सोसायट्यांमध्ये नदी पात्रातील पाणी शिरले. या पाण्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले…

Union Minister of State Muralidhar Mohols reaction to Sanjay Rauts criticism in the drugs case
ड्रग्ज प्रकरणावरील संजय राऊतांच्या टीकेला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं प्रत्युत्तर

ड्रग्ज प्रकरणावरील संजय राऊतांच्या टीकेला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं प्रत्युत्तर | Murlidhar Mohol

BJP MP Murlidhar Mohol reaction after gets state ministry
BJP MP Murlidhar Mohol | अमित शाह कडक हेडमास्तर, त्यांच्याबरोबर काम करणं…

पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच पुण्यात प्रसार माध्यमांशी…

Pune Murlidhar Mohol directly appointed as a minister in Central in the first term
Murlidhar Mohol | पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच टर्ममध्ये थेट केंद्रात मंत्रीपद!

पुण्यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव करून लोकसभेची निवडणूक जिंकली. ही त्यांची खासदारकीची…

Appreciation of Ravindra Dhangekar by Supriya Sule
Supriya Sule on Ravindra Dhangekar: सुप्रिया सुळेंकडून धंगेकरांचं कौतुक, नेमकं काय म्हणाल्या? प्रीमियम स्टोरी

पुण्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा निवडणुकीत पराभव झाला. महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांचं आव्हान धगेंकरांपुढे होतं. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित…

Muralidhar Mohol won the Lok Sabha election seat from Pune
Murlidhar Mohol on Result: पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांची सरशी, विरोधकांना लगावला टोला

पुण्यातून भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. पुण्यातील लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. कारण मोहोळ यांच्याविरोधात मविआचे आमदार…

Ravindra Dhangekar expressed his regret after the Lok Sabha elections
Ravindra Dhangekar on Loksabha Elections: लोकसभा निवडणुकीनंतर रविंद्र धंगेकरांनी बोलून दाखवली खंत!

पुणे लोकसभेच्या निवडणुकीच मतदान दोन दिवसांपूर्वी झाले. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि वंचित…

ताज्या बातम्या