Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

नारायण राणे News

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा जन्म १० एप्रिल १९६२ रोजी मुंबईत झाला. सध्या भाजपात असलेले राणे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजय मिळविला. दोन वेळा खासदार असलेल्या शिवसेना उबाठा गटाच्या विनायक राऊत यांचा त्यांनी पराभव केला. त्याआधी त्यांनी राज्यसभेचे सदस्य असताना केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाची जबाबदारी सांभाळली. १९९९ मध्ये त्यांनी अल्प कालावधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले होते.


चेंबूरमध्ये शिवसेनेचे शाखाध्यक्ष म्हणून आपली राजकीय कारकिर्द सुरू करणारे नारायण राणे हे शिवसेनेचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जात होते. २००५ साली पक्षाअंतर्गत मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी आघाडी सरकारमध्ये महसूल, उद्योग, बंदर, रोजगार आणि स्वयंरोजगार अशा विविध खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. विधानपरिषदेचे आमदार असताना राणे यांनी २०१७ मध्ये काँग्रेस पक्षही सोडला आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. पुढे १५ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांनी आपला पक्ष भाजपात विलीन केला.


नारायण राणे यांना निलेश राणे (Nilesh Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) अशी दोन मुले आहेत. निलेश राणे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार असून आता ते भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवर आहेत. तर नितेश राणे कणकवली विधानसभेतून भाजपाचे आमदार आहेत. २४ ऑगस्ट २०२१ रोजी राणे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली मारण्याच्या वक्तव्याबद्दल अटक करण्यात आली होती.


Read More
raj thackeray
Raj Thackeray महायुतीत येणार? नारायण राणे, दीपक केसरकर सूचक वक्तव्य करत म्हणाले, “निवडणूक जवळ आल्यावर…”

Raj Thackeray MNS NDA : राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना २५० जागांवर लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

Narayan Rane Uddhav Thackeray
Narayan Rane : “उद्धव ठाकरेंना चांगल्या भाषेत बोलता येत नाही, त्यांना बजेट…” ; नारायण राणेंची टीका

Narayan Rane : नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Narayan Rane, Vinayak Raut,
नारायण राणे यांच्या खासदारकीला विनायक राऊत यांचे आव्हान

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार नारायण राणे यांच्या निवडीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी…

PM Narendra Modi Oath Taking Ceremony Updates in Marathi or/ Narendra Modi Swearing-in Ceremony Updates
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : महाराष्ट्रातील सहा खासदारांचं मंत्रिपद पक्कं? NDA तील प्रमुखांच्या फोननंतर प्रतिक्रिया देत म्हणाले…

PM Narendra Modi Oath Taking Ceremony Updates : नरेंद्र मोदी यांच्याबरोबर देशातील ३० खासदार केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.

uddhav Thackeray stronghold fort Shaken by victory of narayan rane in sindhudurg ratnagiri lok sabha constituency election 2024
नारायण राणेंच्या विजयामुळे ठाकरेंच्या गडाला सुरुंग

ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती असल्यामुळे गेल्या सुमारे २५ वर्षांत भाजपाने कोकणाकडे तसे दुर्लक्षच केले. पण ही युती मोडल्यानंतर झालेल्या पहिल्याच…

Union Minister Narayan Rane wins Lok Sabha elections in Talkokan
दोन पराभवांची राणेंकडून परतफेड; तळकोकणात महायुतीला चांगेलच यश

गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश यांना पत्करावा लागलेल्या पराभवाचा पराभवाची मंगळवारी राणे यांनी विजय…

narayan rane vs vinayak raut ratnagiri
कोकणात पुन्हा नारायण राणेंचाच बोलबाला, विनायक राऊतांचा केला दणदणीत पराभव

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. ७ मे रोजी झालेल्या मतदानात ६१.५२ टक्के मतदान झाले होते.

Sanjay Raut On Devendra Fadnavis
संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला; म्हणाले, “राजकारणातलं कच्चं मडकं…”

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार…

Narayan Rane VS Vinayak Raut
नारायण राणेंचा विनायक राऊतांना टोला; म्हणाले, “मला पेपर सोपा वाटतो, जे अभ्यास करत नसतात त्यांना…”

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुचीचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे.

ताज्या बातम्या