Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

नारायण राणे Photos

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा जन्म १० एप्रिल १९६२ रोजी मुंबईत झाला. सध्या भाजपात असलेले राणे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजय मिळविला. दोन वेळा खासदार असलेल्या शिवसेना उबाठा गटाच्या विनायक राऊत यांचा त्यांनी पराभव केला. त्याआधी त्यांनी राज्यसभेचे सदस्य असताना केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाची जबाबदारी सांभाळली. १९९९ मध्ये त्यांनी अल्प कालावधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले होते.


चेंबूरमध्ये शिवसेनेचे शाखाध्यक्ष म्हणून आपली राजकीय कारकिर्द सुरू करणारे नारायण राणे हे शिवसेनेचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जात होते. २००५ साली पक्षाअंतर्गत मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी आघाडी सरकारमध्ये महसूल, उद्योग, बंदर, रोजगार आणि स्वयंरोजगार अशा विविध खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. विधानपरिषदेचे आमदार असताना राणे यांनी २०१७ मध्ये काँग्रेस पक्षही सोडला आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. पुढे १५ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांनी आपला पक्ष भाजपात विलीन केला.


नारायण राणे यांना निलेश राणे (Nilesh Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) अशी दोन मुले आहेत. निलेश राणे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार असून आता ते भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवर आहेत. तर नितेश राणे कणकवली विधानसभेतून भाजपाचे आमदार आहेत. २४ ऑगस्ट २०२१ रोजी राणे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली मारण्याच्या वक्तव्याबद्दल अटक करण्यात आली होती.


Read More
Narayan Rane Raj Thakre meeting
11 Photos
Raj Thackeray : लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपाच्या ‘या’ दिग्गज नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट!

Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिल्याचे जाहीर…

uddhav thackeray
9 Photos
“… तर गुंडगिरीला मत” उद्धव ठाकरेंची कणकवलीत तुफान फटकेबाजी; मोदींना टोला तर भाजपावर हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेतून भाजपा उमेदवार नारायण राणेंवर हल्लाबोल केला आहे.

rane vs thackeray
10 Photos
Lok Sabha Election 2024 : नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये जाण्याआधीच काय दिला इशारा?

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील टोकाचे वाद महाराष्ट्राला नवीन नाहीत, अशातच आता हा नवा वाद उभा राहताना दिसत आहे.

narayan rane sanjay dutt (1)
6 Photos
“‘मातोश्री’वर संजय दत्त कुठल्या गेटने बॅग घेऊन आत आला, हे…”, नारायण राणेंचा मोठा दावा

“एक कामगारामागे ४ लाख रूपये याप्रमाणे…”, असा गंभीर आरोपही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

ajit pawar, narayan rane
9 Photos
PHOTOS: अजित पवारांपासून ते नारायण राणे ‘या’ राजकीय नेत्यांची विधानं आजही चर्चेत; पाहा कोण काय म्हणाले?

अजित पवारांपासून ते नारायण राणेंपर्यंत अनेक राजकीय नेत्यांची विधानं आज चर्चेत होती.

Narayan Rane Uddhav Thackeray Rashmi Thackeray Sanjay Raut 2
18 Photos
Photos : “संजय राऊतांनी मला उद्धव-रश्मी ठाकरेंबद्दल जे सांगितलं ते मी…”, नारायण राणेंनी नेमके काय गंभीर आरोप केले? वाचा…

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. ते नेमकं…

sanjay raut criticized raj thackeray
9 Photos
“शिवसेना भवनात अनेकांचा जीव अडकलाय, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या सभेवरून संजय राऊतांची खोचक टीका

संजय राऊत यांनी आज नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलताना विविध मुद्यांवर भूमिका स्पष्ट केली.

Sanjay raut and Narayan Rane
9 Photos
PHOTOS : “कालपर्यंत मी गप्प होतो आज तू मर्यादा सोडली आहेस, हिंमत आहे तर एकटा फिर… ” संजय राऊतांचा नारायण राणेंना इशारा!

पाहा एकेरी भाषेत नेमकी काय टीका केली आहे; नारायण राणेंचं मंत्रीपद जाणार असल्याचही भाकीत राऊतांनी केलं आहे.