नागपूर : वाहतुकीचे नियम तोडण्यात नागपूरकर राज्यात पहिल्या क्रमांकावर असून वाहतूक पोलिसांनी तीन महिन्यांत ३ लाख १५ हजार वाहनचालकांवर कारवाई करून ४ कोटी ७५ लाख रुपये दंड वसूल केला. यामध्ये फक्त तीन महिन्यात दोन लाखांवर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई केल्याचा समावेश आहे. ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे.

नागपुरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये मोठी चढाओढ असते. शासनाकडून दंडाची रक्कम वाढवल्यानंतर वाहतूक नियम पाळणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी आशा होती. मात्र, याउलट वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते मार्च या महिन्यादरम्यान नागपुरात ३ लाख १५ हजार वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यात सर्वाधिक चालान हेल्मट न घालणाऱ्यांवर करण्यात आले. १ लाख ९८ हजार २११ वाहनचालकांवर हेल्मट न घातल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे. मात्र, अनेक ठिकाणी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी अनेक ठिकाणी वाहनतळ निर्माण केली आहेत. तरीही अनेक वाहनचालक रस्त्यावर वाहन उभे करतात. ही स्थिती बाजाराची ठिकाणे, गजबजलेली ठिकाणे, रुग्णालये, शाळा-महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये, अशा ठिकाणी जास्त असते.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Election Commission, maharashtra Director General of Police, Rashmi Shukla
विश्लेषण : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर निवडणूक आयोगाने का हटविले?
kalyan Dombivli municipal corporation
डोंबिवलीतील कोपरमध्ये स्थगिती आदेश देऊनही बेकायदा बांधकामाची उभारणी सुरूच; शासन, कडोंमपाचे आदेश बांधकामधारकांकडून दुर्लक्षित
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
Seaweed imports What is the use of the element What is the benefit of this decision of the central government
चक्क समुद्र शैवालाची आयात? या घटकाचा उपयोग काय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किती फायदा?
without helmet officers and employees should be banned from pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : हेल्मेट नसल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेत मज्जाव
250 kg of firecrackers seized in action against firecrackers sellers without license
रस्ते, पदपथांवर विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई, २५० किलो फटाके जप्त

हेही वाचा : गडचिरोलीत सक्रिय जहाल नक्षल नेता जोगन्ना अबुझमाडच्या चकमकीत ठार, शंभरहून अधिक गुन्ह्यांत आरोपी

वाहतूक पोलिसांनी नेमलेल्या खासगी कंपनीची वाहने रस्त्यावरील वाहने टोईंग वाहनातून टाकून वाहतूक कार्यालयात नेतात. दुचाकीला ७८६ तर चारचाकीला १०५० रुपये दंड आकारल्या जातो. तरीही नागपूरकरांची रस्त्यावर वाहने उभी ठेवण्याच्या सवयीत सुधारणा होत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर वाहने उभे करणाऱ्या २४ हजार ३५३ चालकांवर कारवाई केली. चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन) नसल्यानंतरही अतिआत्मविश्वासाने वाहन चालवल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी विशेष मोहीम राबवून गेल्या तीन महिन्यांत २२ हजार चालकांवर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : धक्कादायक! बनावट कागदपत्रांवरून परराज्यातील वाहनांची नागपूर आरटीओत नोंदणी

नियम तोडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक महिला-तरुणी

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये तरुणी, महिला आणि युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्यांमध्ये बरीच वाढ झाली असून गेल्या तीन महिन्यांत ७ हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. १३ हजार वाहनचालकांवर वाहतूक सिग्नलचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहनाला फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्या ६ हजार ३०० चालकांवर कारवाई करण्यात आली.

रस्ते अपघात होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस सकारात्मक प्रयत्न करीत आहेत. वाहतूक नियमांचे सर्वांनी पालन करावे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. कारवाईची ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल.

जयेश भांडारकर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा