scorecardresearch

प्रभास Photos

‘बाहुबली’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ रोजी हैदराबादमध्ये झाला आहे. प्रभासचं संपूर्ण नाव सूर्यनारायण वैंकट प्रभास राजु उप्पलपाटि असं आहे. प्रभास त्याच्या उत्तम अभिनयामुळे केवळ भारतातच नाही तर जगभरातही प्रसिद्ध आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असलेल्या प्रभासनं आतापर्यंत तब्बल ७ दाक्षिणात्य फिल्म फेअर पुरस्कार जिंकले आहेत. प्रभास हा देशभरात सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्यानं ‘साहो’ चित्रपटासाठी तब्बल १०० कोटी रुपये तर ‘राधे श्याम’साठी १५० कोटी रुपये एवढं मानधन घेतलं होतं. प्रभासनं २००२ साली ‘ईस्वर’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. जवळपास १९ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दित त्यानं २० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या ४२ वर्षीय प्रभासने अद्याप लग्न केलेलं नाही. Read More
Bhola Shankar to Adipurush salary
9 Photos
२०२३ मध्ये साऊथच्या मोठ्या स्टार्सचे ‘हे’ ८ बिग बजेट चित्रपट आपटले, यादीत प्रभास, चिरंजीवीचाही समावेश

यंदा संपूर्ण देशभरात अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळाला. परंतु, काही बिग बजेट चित्रपट सपशेल अपयशी ठरले.

Dunki | Salaar | Shahrukh Khan
9 Photos
‘डंकी’ Vs ‘सालार’: केवळ चित्रपटच नाही तर दिग्दर्शकांमध्येही स्पर्धा, जाणून घ्या प्रशांत नील अन् राजू हिरानींबद्दल

राजू हिरानी यांच्या चित्रपटांना सरासरी २.४ कोटी प्रेक्षक मिळाले, तर प्रशांत नील यांच्या प्रेक्षकांची संख्या २.२ कोटी होती.

om raut (2)
12 Photos
फक्त एका मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन अन् नंतर थेट बॉलीवूडमध्ये झेप; जाणून घ्या ‘आदिपुरुष’चा दिग्दर्शक ओम राऊतबद्दल…

ओम राऊतचं दिग्दर्शन असलेला तिसराच चित्रपट हा ७०० कोटींचं बजेट असलेला आहे.

high paid actor
9 Photos
अक्षय कुमार नाही तर ‘हे’ दाक्षिणात्य अभिनेते आहेत सर्वाधिक कमाई करणारे कलाकार, मानधनाचे आकडे ऐकून व्हाल थक्क

केवळ अभिनयाच्या बाबतीतच नाही तर फीच्या बाबतीतही दाक्षिणात्य अभिनेते बॉलिवूड कलाकारांपेक्षा कमी नाहीत.

ताज्या बातम्या