२०२३ हे वर्ष संपायला अवघे १० दिवस उरले आहेत. सध्या बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त चर्चा शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या दोन चित्रपटांची आहे. पहिला म्हणजे ‘डंकी’ व दुसरा ‘सालार’. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘डिंकी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘डंकी’ ची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. याबरोबरच साऊथचा सुपरस्टार प्रभासचा ‘सालार’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

सोशल मीडियावरही या चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रदर्शित होण्याआधीच शाहरुख खानचा या वर्षातील तिसरा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘डंकी’ आणि प्रभासचा ‘सालार’ यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये दोन्ही चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘सालार’ चे दिग्दर्शन ‘केजीएफ’ फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांनी केले आहे तर ‘डंकी’ चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे.

Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!

आई अन् आजी सुपरस्टार, अभिनेत्याबरोबरच्या एका MMS ने संपवलं ‘या’ अभिनेत्रीचं करिअर; आता काय करते? वाचा

वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात दिवसात बॉक्स ऑफिसवर शाहरुख खान विरुद्ध प्रभास असा सामना होणार आहे. पण शाहरुख खान आणि प्रभासमध्ये सर्वात महागडा अभिनेता कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का? शाहरुख खानने ‘डंकी’साठी किती मानधन घेतले आणि प्रभासने ‘सालार’साठी किती मानधन घेतले? याबाबत जाणून घेऊयात.

Photos: प्रसिद्ध अभिनेत्रीने IFS अधिकाऱ्याशी बांधली लग्नगाठ; शिव-पार्वतीचे लग्न झालेल्या प्राचीन मंदिरात घेतले सात फेरे

शाहरुख खानचे मानधन

‘डंकी’मध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये त्याने ‘हार्डी’ नावाची भूमिका साकारली आहे. यापूर्वी ‘पठाण’ आणि ‘जवान’ हिट झाल्यानंतर त्याने आपले मानधन वाढवल्याच्या बातम्या आल्या होती. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्याने ‘डंकी’ साठी २९ कोटी रुपये घेतले आहेत.

प्रभासने ‘सालार’ साठी किती मानधन घेतले?

‘सालार’ साठी प्रभासने जवळपास १०० कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर चित्रपटाच्या नफ्यातही त्याचा वाटा असेल आणि हा वाटा जवळपास १० टक्के असेल, असं म्हटलं जात आहे. हे दोन्ही चित्रपट उद्या म्हणजेच २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि कोणता चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवतो, हे लवकरच कळेल.