scorecardresearch

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) Videos

राजस्थान रॉयल्स हा इंडियन प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामामध्ये विजेतेपद मिळवून ट्रॉफी जिंकणारा संघ आहे. सवाई मानसिंग स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. शिल्पा शेट्टी-कुंद्रा, लचलान मर्डोक आणि गॅरी कार्डिनेल यांच्याकडे संघाची मालकी आहे. जून २००८ या संघाने शेन वॉनच्या (Shane Warn) नेतृत्त्वाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai super Kings) पराभव करत इतिहास रचला होता. पुढील वर्षांमध्ये संघाने चांगली कामगिरी केली नाही. ते प्लेऑफ्समध्येही जागा मिळवू शकले नाही. संघाचा खेळ खराब होत असताना २०१३ मध्ये राजस्ठान रॉयल्सच्या खेळाडूंवर फिक्सिंग आणि बेटींगचा आरोप करण्यात आले. २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय दिला. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राजस्थान रॉयल्सवर बंदी आली. २०१८ मध्ये ही बंदी हटवण्यात आली. २०१८ ते २०२१ या चार वर्षांमध्ये संघ गुण तालिकेमध्ये खालच्या स्थानावर होता. पुढे २०२२ मध्ये मेगा ऑक्शनमध्ये व्यवस्थापकांनी अनेक नव्या खेळाडूंना संघामध्ये सामील केले. या हंगामातील अनेक सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्स संघाने चांगला खेळ दाखवला. ते अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले. पण त्यांना ट्रॉफी जिंकता आली नाही. २००८ पासून आत्तापर्यंत संघातील अनेक खेळाडूंना कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती.


२०२२ पासून संजू सॅमसन (Sanju Samson) हा राजस्ठान रॉयल्सचा कर्णधार आहे.२०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय दिला. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राजस्थान रॉयल्सवर बंदी आली. २०१८ मध्ये ही बंदी हटवण्यात आली. पुढील दोन-तीन वर्षांमध्ये संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर लिलावामार्फत नवे खेळाडू संघामध्ये सामील झाले. २०२२च्या पंधराव्या हंगामामध्ये संघाने चांगला खेळ दाखवला. पण अंतिम सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला.


Read More