पुणे: शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांची विमाननगर भागातील सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मेटे यांच्या मुलाने याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यानुसार मेटे यांची बहीण आणि त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आशुतोष विनायक मेटे (वय २०, रा. कोरेगाव पार्क) याने विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याची आत्या सत्यशीला महादेव जाधव आणि त्यांचा मुलगा आकाश (दोघे रा. पंचगंगा सोसायटी, ठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… पुणे: शरीरसंबंधास विरोध केल्याने महिलेचा खून; दोघे गजाआड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदनिकेची कागदपत्रे मेटे यांच्या पत्नीच्या नावावर होती. जाधव यांनी सदनिकेचे कुलूप तोडून बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद मेटे यांचा मुलगा आशुतोष याने दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघाती मृत्यू झाला होता. मेटे यांनी मृत्यूपूर्वी विमाननगर भागातील गंगापूरम सोसायटीत सदनिका खरेदी केली होती. मेटे यांनी सदनिका बहीण सत्वशीला आणि भाचा आकाश यांना भेट दिली होती, असा दावा जाधव यांच्याकडून करण्यात आला आहे.