scorecardresearch

व्यंकय्या नायडू Photos

मुप्पावरपू व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांचा जन्म १ जुलै १९४९ रोजी आंध्र प्रदेशातील(Andhra Pradesh) नेल्लोर येथे झाला. नायडू हे भारताचे १३ वे आणि वर्तमान उपराष्ट्रपती आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून (ABVP)आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

ते नेल्लोरच्या व्ही. आर. कॉलेजमध्ये १९७१ साली विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडूनआले होते. २००२ ते २००४ दरम्यान ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तसेच अटलबिहारी वाजपेयीसरकारमध्ये ते केंद्रीय ग्राम विकास मंत्री होते. ११ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांनी भारताचे उप राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

१९७८ आणि १९८३ साली सलग दोनवेळा ते नेल्लोर जिल्ह्यातील उदयगीरी मतदार संघातून आंध्र प्रदेशाच्या विधानसभेत निवडून आले होते. याशिवाय १९९८, २००४ आणि २०१० सलग तीनवेळा ते राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
Read More