scorecardresearch

वेस्ट इंडिज Videos

उत्तर अटलांटिक महासागर आणि कॅरिबियन समुद्र यांच्यामध्ये स्थित १३ स्वतंत्र बेटांनी वेस्ट इंडिज (West Indies) हा देश बनला आहे. या बेटांवर पोहचणारा ख्रिस्तोफर कोलंबस हा पहिला युरोपियन प्रवासी होता. १४९२ साली भारताच्या शोधामध्ये असताना त्याने या देशामध्ये प्रवेश केला. पुढे वसाहतवादानंतर या बेटांवर ब्रिटीशांचे राज्य होते. त्यांनीच येथे क्रिकेट हा खेळ पोहोचवला. १९६२ मध्ये ही बेटं स्वतंत्र झाली.

१९७० च्या मध्यापासून ते १९९० च्या सुरुवातीपर्यंत वेस्ट इंडियन क्रिकेट टीमचे वर्चस्व होते. याच काळात १९७५ आणि १९७९ या वर्षामध्ये या क्रिकेट संघाने विश्वचषकावर नाव कोरले होते.

कसोटी, एकदिवसीय सामने आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये या संघातील खेळाडू उत्तम खेळ दाखवतात. वेस्ट इंडिज संघामध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले आहेत. खेळासह या खेळाडूंचे व्यक्तिमत्त्व आणि एकूण राहणीमान खूप वेगळे असते.
Read More

ताज्या बातम्या