News Flash

माझा पोर्टफोलियो : सबुरीने गुंतवणुकीची गोड फळे!

‘माझा पोर्टफोलियो’ अंतर्गत यंदा मुख्यत्वे स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सवर भर दिला होता.

arth05‘माझा पोर्टफोलियो’ अंतर्गत यंदा मुख्यत्वे स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सवर भर दिला होता. त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला. एकूण १०,४२३ रुपयांच्या गुंतवणुकीवर १,३९३ रूपयांचा नफा केवळ सहा महिन्यांत मिळाला आहे. सरळ टक्केवारीने पोर्टफोलियोचा हा सहमाही परतावा १३.४ % दिसत असला तरीही त्याचा ‘आयआरआर’ तब्बल ६३.११% आहे हे लक्षात घ्यायलाच हवे. किंबहुना ‘माझा पोर्टफोलियो’ची कामगिरी ही मुंबई शेअर बाजाराच्या परताव्याच्या (३१.२७%) तुलनेत खूपच सरस आहे. सुचविलेल्या शेअर्सपैकी ल्यूमॅक्स, एचपीसीएल, पॉली मेडिक्यूयर आणि यूपीएल सारख्या कंपन्यांनी अल्पवधीतच उत्तम परतावा दिला आहे. आपले नफ्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याने गुंतवणूकदार हे शेअर्स विकून टाकून नफा पदरात पाडून घेऊ शकतात. बाकी शेअर्सचे काय करायचे हे गुंतवणूकदारांनी आपापल्या उद्दिष्टाप्रमाणे ठरवायचे आहे. ‘ब्रेग्झिट’चा आपल्या पोर्टफोलियोवर सुदैवाने परिणाम झाला नसला तरीही खरा परिणाम कळायला थोडा वेळ जाऊ द्यावाच लागेल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार हाच उत्तम पर्याय आहे. आजवरचा इतिहास पाहता शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडांत दीर्घकालीन गुंतवणूकच फायद्याची ठरते हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे संधी मिळताच प्रत्येक मंदीला शेअर बाजारातून उत्तम कंपन्यांचे शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करायचे धोरण ठेवावे. चांगल्या कंपन्यांतील दीर्घकालीन गुंतवणूक कायम फायद्याचीच ठरते हे आपण अनुभवले आहेच. पोर्टफोलियोच्या वाचकांना आणि गुंतवणूकदारांना पुढील गुंतवणुकीसाठी शुभेच्छा..!
पोर्टफोलियोचा वेध – पहिली सहामाही-२०१६
arth04

अजय वाळिंबे stocksandwealth@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 1:01 am

Web Title: companies half yearly results
Next Stories
1 गाजराची पुंगी : ‘डेव्हिडी’ प्राणायाम..
2 पोर्टफोलिओ बांधताना : पोर्टफोलिओ आणि जोखीम व्यवस्थापन
3 माझा पोर्टफोलियो : नवीन उत्पादने, उत्तम गुणवत्तेचे सातत्य..
Just Now!
X