सामान्यतः भारतीय स्वयंपाकात सुगंधी मसाला म्हणून वापरली जाणारी लवंग ही त्यांच्या अँटिऑक्सिडंट आणि प्रतिजैविक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. परिणामी, लंवग आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे देते आणि नियमितपणे सेवन करण्याची शिफारस केली जाते. ब्रिटीश भारतीय वैद्यकीय व्यावसायिक डॉ. रुपी औजला यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या फॉलोअर्सला “रोज लवंग चघळण्याचे फायदे” सांगितले आहेत. एका रीलमध्ये त्यांनी दररोज लवंग चघळण्याच्या अनेक फायद्यांचा उल्लेख केला आहे, ज्यात जळजळ प्रभावीपणे बरे करण्याची क्षमता, रक्तदाब कमी करणे आणि तोंडाचे आरोग्य राखणे या फायद्यांचा समावेश आहे.”

लवंग चघळण्याचे आरोग्य फायदे
डॉ. औजला यांच्याशी सहमती दर्शवत आसरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. जगदीश जे. हिरेमठ यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “लवंग ही युजेनॉलने समृद्ध आहे, हे एक शक्तिशाली प्रतिजैविक घटक आहे, जे हिरड्यांना आलेली सूज (Gingivitis) आणि पीरियडॉन्टायटिस (periodontitis) सारख्या रोगांसाठी जबाबदार तोंडांतील रोगकारकांशी लढण्यास मदत करते.”

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
Is thirst a good predictor of dehydration
तहान लागते म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा…
yoga poses to relieve gas
Health Special: पोटातील गॅसवर योगासनांचा जालीम उपाय; नेमके काय कराल? – भाग २
What is the Leidenfrost effect
Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…
What is the right time to have breakfast
सकाळी ८ ते १० नाही, तर नाश्त्याची ही वेळसुद्धा ठरू शकते फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचे मत…

डॉ. हिरेमठ सांगतात की, “अभ्यासांमध्ये असे सुचवले आहे की, “युजेनॉल जीवाणू, बुरशी आणि विषाणूंविरूद्ध प्रभावी आहे, जे मौखिक स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यात त्याची भूमिका अधोरेखित करते.”

प्रतिजैविक गुणधर्मांच्या पलीकडे लवंग त्यांच्या उच्च अँटिऑक्सिडेंट घटकांसाठी ओळखली जाते. लवंगमधील अँटिऑक्सिडंट्स, जसे की फ्लेव्होनॉइड्स (Flavonoids) आणि आयसोफ्लाव्होन (Isoflavones), फ्री रॅडिकल्सला (Free Radicals) तटस्थ करण्यात मदत करतात, ज्यामुळे सेल्युलर नुकसान टाळता येते आणि हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो, असे डॉ. हिरेमठ सांगतात.

त्यांनी सांगितले की, “लवंगचे दाहक-विरोधी प्रभाव हा इंफ्लेमेटरी साइटोकिन्स (Inflammatory Cytokines) आणि एन्झाईम्सच्या (Enzymes) प्रतिबंधाद्वारे मध्यस्थी करतात, ज्यामुळे संपूर्ण शरीरात जळजळ कमी होऊ शकते. संधिवात आणि इतर दाहक विकारांसारख्या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे.

हेही वाचा – तुम्ही सकाळी उठल्या उठल्या फळांचा रस पिता का? उपाशीपोटी फळांचा रस का पिऊ नये? डॉक्टरांनी सांगितले कारण…

दातदुखी कमी करण्यासाठी आणि हिरड्यांचे आजार हाताळण्यासाठी लवंग ठरते प्रभावी

डॉ. हिरेमठ यांच्या मते लवंग चघळल्याने खालील प्रकारे दातदुखी आणि हिरड्यांचे आजार कमी होण्यास मदत होते:

वेदनाशामक गुणधर्म : लवंगमध्ये आढळणारे युजेनॉल हे केवळ प्रतिजैविक घटक नसून नैसर्गिक वेदनाशामक आणि भूल देणारे औषधदेखील आहे, जे सामान्यतः दातदुखीच्या तात्पुरत्या आरामासाठी दातांची काळजी घेण्यासाठी वापरले जाते. दातांच्या वेदना कमी करण्यासाठी लवंग प्रभावी आहे, याचा उल्लेख दंत साहित्यात केला जातो.

हिरड्यांचे आरोग्य : जळजळ आणि बॅक्टेरियाची वाढ कमी करून, लवंग निरोगी हिरड्या निर्माण करण्यात योगदान देऊ शकते, हिरड्यांच्या आजारांच्या वाढीस प्रतिबंध किंवा मंद करू शकते. लवंग आधारित माउथवॉश किंवा तेलांचा नियमित वापर मौखिक आरोग्य राखण्यासाठी विशेषतः प्रभावी ठरू शकतो.

लवंग आणि पाचक आरोग्य

डॉ. औजला इष्टतम पाचक आरोग्यासाठी लवंग चघळण्याच्या महत्त्वावर भर देतात. डॉ. हिरेमठ लवंगमध्ये असे कोणते घटक आहे, जे पाचक आरोग्यासाठी मदत करतात याबाबत सांगतात.

पाचक एन्झाईम्सचा स्राव उत्तेजित होणे : लवंग पाचक एन्झाईम्सचा स्राव उत्तेजित करते, ज्यामुळे पचन सुधारते आणि सूज येणे, गॅस आणि अपचन यांसारख्या जठरासंबंधित त्रासाची लक्षणे कमी करते.

अन्ननलिकेवर दाहकविरोधी प्रभाव : लवंगमधील दाहकविरोधी गुणधर्म अन्ननलिकेच्या अस्तराला शांत करते आणि जळजळसंबंधित पाचन समस्या कमी करतात.

हेही वाचा – अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग

लवंगच्या वारंवार सेवनामुळे होणारे धोके

लवंगमधील युजेनॉल फायदेशीर असले तरी डॉ. हिरेमठ चेतावणी देतात की, “जास्त प्रमाणात लवंग सेवन केल्याने यकृताचे नुकसान होऊ शकते, विशेषत: आधीपासून यकृत संबंधी समस्या असलेल्या व्यक्तींना त्यामुळे त्रास होऊ शकतो. युजेनॉलसाठी उपचारात्मक निर्देशांक (प्रभावी डोस आणि हानिकारक डोस यांच्यातील श्रेणी) मर्यादित आहे आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.

“लवंग त्यांच्या रक्त पातळ करण्याच्या गुणधर्मामुळे (रक्त गोठण्याची क्रिया थांबवणारे द्रव्य) Anticoagulant औषधांशीदेखील प्रक्रिया साधू शकते. अशी औषधे घेत असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आहारात लवंगचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,” असे डॉ. हिरेमठ ठामपणे सांगतात.

दैनंदिन आहारात लवंग समाविष्ट करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे

“रोज एक ते दोन लवंग अशा थोड्या प्रमाणात वापरणे फायदेशीर ठरू शकते”, असे डॉ. हिरेमठ सांगतात. आरोग्याच्या फायद्यासाठी लवंग ही चहा, भाजलेल्या पदार्थांमध्ये किंवा आहारामध्ये वापरू शकता.

गर्भवती स्त्रिया, यकृताचा आजार असलेल्या व्यक्ती आणि रक्त पातळ करणारी औषधे घेत असलेल्यांनी लवंग सावधपणे आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार वापरावी. संभाव्य प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी मुलांनीही पालकांच्या देखरेखीखाली लवंग वापरावी.