18 November 2017

News Flash

राजीव गांधी इक्विटी योजनेअंतर्गत ‘एचडीएफसी आरजीईएसएस फंड’ विक्रीला खुला

केंद्र सरकारने नवगुंतवणूकदारांना कर सवलतीचा लाभ देत योजलेल्या ‘राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्ज योजनेअंतर्गत’ एचडीएफसी

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 21, 2013 12:30 PM

केंद्र सरकारने नवगुंतवणूकदारांना कर सवलतीचा लाभ देत योजलेल्या ‘राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्ज योजनेअंतर्गत’ एचडीएफसी म्युच्युअल फंडाने ‘एचडीएफसी आरजीईएसएस- सिरीज १’ ही योजना विक्रीसाठी खुली केली आहे. ही तीन वर्षांची मुदतबंद इक्विटी योजना असून ती प्रारंभिक विक्रीसाठी ८ मार्च २०१३ पर्यंत खुली आहे.  ‘एचडीएफसी आरजीईएसएस’मधून बीएसई १०० अथवा सीएनएक्स १०० या निर्देशांकातील महारत्न, नवरत्न, मिनीरत्न दर्जाच्या सार्वजनिक क्षेत्रातील आणि सरकारची ५१ टक्क्यांपेक्षा अधिक मालकी असलेल्या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक केली जाणार आहे. वार्षिक १० लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या आणि शेअर बाजारात आजवर कोणतीही गुंतवणूक नसलेल्या गुंतवणूकदारांना या योजनेत ५० हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर २५,००० रुपये इतकी कर वजावट प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सीसीजी अन्वये मिळविता येईल. कलम ८० सीद्वारे मुभा दिलेल्या कमाल  १ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीच्या बरोबरीने हा अतिरिक्त करलाभ देऊ करण्यात आला आहे. ‘एचडीएफसी आरजीईएसएस’मध्ये किमान रु. ५०० आणि त्यापुढे १० रुपयांच्या पटीत गुंतवणूक करण्याची संधी देण्यात आली आहे, असे एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलींद बर्वे यांनी सांगितले.

११,२०० कोटींच्या कर  थकबाकीच्या प्रकरणी व्होडाफोनकडून आलेला सामंजस्याचा प्रस्ताव ध्यानी घेत,  देशाच्या अ‍ॅटर्नी जनरलशी सल्लामसलत करूनच मंत्रिमंडळाकडून अंतिम निर्णय घेतला जाईल असे आम्ही त्यांना कळविले आहे.
-पी. चिदम्बरम
केंद्रीय अर्थमंत्री

First Published on February 21, 2013 12:30 pm

Web Title: sale stared of hdfc rgess fund