‘आयसीआयसीआय’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
भारतीय तरुणाई वर्षांतून किमान एकदा परदेशात प्रवास करण्यास पसंती देत असून दहापकी नऊ जण त्यांच्या परदेशी सहलीसाठी बचतीचे पसे खर्च करत आहेत, असे निरीक्षण ‘आयसीआयसीआय मिलेनियल ट्रॅव्हल स्टडी २०१५’ मध्ये नुकतेच नोंदवण्यात आले आहे.
ज्येष्ठ पिढीपकी ८८ टक्के जणांनी क्वचितच आलिशान सहलींसाठी पसे खर्च केले असून त्यातुलनेत आजच्या तरुणाईच्या प्रवासाचे प्रमाण खूप जास्त आहे. मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, बेंगळुरू, अहमदाबाद आणि कोलकाता येथील २० ते ३५ वर्षांच्या वयोगटातील १,०४९ जणांनी दिलेल्या मतावर हे सर्वेक्षण आधारित असून त्यात भारतीय तरुणाईच्या प्रवासाविषयक सवयींचे औत्सुक्यपूर्ण कल दिसून आले आहेत.
स्वप्नातील पर्यटन स्थळांमध्ये सिंगापूरला सर्वाधिक पसंती मिळाली असून त्याखालोखाल अमेरिका, इंग्लंडला प्राधान्य आहे. ८० टक्के जणांनी पर्यटन स्थळाची निवड करताना त्याठिकाणचा वारसा लक्षात घेत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे ७१ टक्के जण एखाद्या देशात सहलीला जाण्यापूर्वी तेथील आरोग्य व स्वच्छतेबद्दल जाणून घेणे पसंत करतात. या सर्वेक्षणाचा २०१३ मध्ये केल्या गेलेल्या सर्वेक्षणाशी तुलना केल्यास त्यात केवळ ४१ टक्के जण आरोग्य व स्वच्छेला महत्त्व देत असल्याचे मांडण्यात आले होते. फक्त ५७ टक्के जण वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देणे पसंत केले होते व त्यामागे प्रवासी कंपन्यांनी पॅकेज टुर आणि सवलती दिल्याचे कारण प्रमुख होते.
या सर्वेक्षणाबद्दल आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सच्या दावा आणि विमा विभागाचे प्रमुख संजय दत्ता म्हणाले, ‘सहा शहरांत केलेल्या या सर्वेक्षणात तरुण, उदयोन्मुख भारतीयांचे मनस्थिती प्रतििबबित झाली आहे. प्रवास आणि विविध प्रकारच्या संस्कृतीचा अनुभव घेण्यास ते प्राधान्य देतात. मात्र, विविध देशांत सहली आखण्याचे ज्ञान ठेवणाऱ्या तरुणाईपकी फार कमी जण प्रवासाचा विमा उतरवतात.

* ८७ टक्के तरुणाई वर्षांतून किमान एकदा परदेशात पर्यटनासाठी जाते. देशांतर्गत ठिकाणांपेक्षा आंतरराष्ट्रीय स्थळांना जास्त पसंती आणि महागडय़ा ठिकाणांना भेट देण्याची इच्छा
* ९० टक्के तरुणाईला पर्यटन विम्याची माहिती; मात्र केवळ २-५ टक्के तरुणाईकडून परदेशात प्रवास करताना होतो उपयोग