थेट विदेशी गुंतवणूक वाढीचे विविध २१ प्रस्ताव केंद्र सरकारने सोमवारी मंजूर केले. यातील गुंतवणूक २८१ कोटी रुपयांची आहे. असे करताना मात्र सरकारने कोटक महिंद्र बँकेतील विदेशी गुंतवणूक वाढीचा प्रस्ताव मात्र तूर्त नाकारला आहे.

खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्र बँकेत ५५ टक्क्य़ांपर्यंत थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला होता. मात्र त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
यासह १२ प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. त्यात आयआयएफएल होल्डिंग्ज, शेअरखान या वित्त क्षेत्रातील अन्य एका कंपनीचाही समावेश आहे.
२८०.७० कोटी रुपयांच्या २१ प्रस्तावांना थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीला सरकारने परवानगी दिल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यामध्ये १०० कोटी रुपयांच्या ला रेनॉन हेल्थकेअर, ६९ कोटी रुपयेपर्यंतच्या ब्ल्यू डार्ट एक्स्प्रेस, १४.४० कोटींच्या क्वीकजेट कार्गो एअरलाईन्स या कंपन्यांचा समावेश आहे.

bank of maharashtra
‘महाबँके’चे ७,५०० कोटींचे निधी उभारणीचे लक्ष्य; मार्च तिमाहीत निव्वळ नफा १,२१८ कोटींवर
Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव