मुंबईत पावसाने दणक्यात पुनरागमन केले असतानाच, बुधवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने विक्रमी उसळी घेतली. बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच निर्देशांकाने २५, ७३२.८७ ची पातळी गाठत नवा उच्चांक प्रस्थापित केला. निर्देशांकाच्या या सकारात्मक वाटचालीपासून प्रेरणा घेत निफ्टीनेसुद्धा ७,७११.२५ चा टप्पा गाठला. बाजारात परदेशी भांडवलाची आवक वाढल्यामुळे सकाळच्या सत्रात खरेदीदारांनी उत्साह दाखविला. त्यामुळे निर्देशांकाने २७२.०५ अंकांची उसळी घेत आजपर्यंतच्या इतिहासातील विक्रमी पातळी गाठली.