‘ईएमसी’ सर्वेक्षणाचा निष्कर्ष

नवीन ज्ञानाधारित ग्राहकवर्गाची उद्योग-व्यवसाय क्षेत्राला पसंतीक्रम येत्या काळात व्यापार जगताला ध्यानात घेणे भाग ठरेल. या पर्वात अधिकाधिक डिजिटल पद्धतींचा व्यावसायिक प्रक्रियेत अवलंब करून आणि त्या निकषावर पारंपरिक व्यवसायांपुढे कडवे आव्हान उभे करणाऱ्या नवउद्यमींच्या मागे ग्राहकांचे पाठबळही असेल, असे ईएमसी इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातून आढळले आहे. ग्रेहाऊंड रिसर्चद्वारे राबविल्या गेलेल्या पाहणीचे निष्कर्ष मंगळवारी जाहीर झाले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८८ टक्के मंडळींनी पारंपरिक उद्योगक्षेत्राची घडी विस्कटून लावण्याची नवउद्यमींचे (स्टार्टअप्स) बळ हे त्यांनी जपलेले तंत्रज्ञानाधारित चापल्य आणि मागणीनुसार व ग्राहकाच्या सोयीनुसार उत्पादन व सेवेत बदल घडविण्याची बाळगलेली लवचीकता हेच कारण असल्याचे सांगितले.