सकाळच्या सत्रात सार्वकालीक नीचांकासमीप पोहोचणारा रुपया बुधवारी दिवसअखेर मात्र डॉलरच्या तुलनेत ७ पैशांची वाढ होऊन ६०.४० पातळीपर्यंत सावरले. व्यवहाराच्या सुरुवातीलाच रुपया ६०.२० अशा ऐतिहासिक अवमूल्यनानजीक जाऊन ठेपला होता. चलनाचा यापूर्वीचा ६०.२१ हा तळ यावेळी काही अंतरावरच होता. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली. महिन्याच्या अखेरच्या दिवशी आयातदारांकडून अमेरिकन चलनाची मागणी वाढल्याने रुपया कमकुवत बनला. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या वर्षपूर्ती पत्रकार परिषदेत व्यक्त झालेल्या अर्थव्यवस्थेतील आश्वासक विधानांनी अखेर रुपया भक्कम बनल्याचे मानले जाते. दिवसभरात चलनाचा वरचा टप्पा ६०.३० पर्यंत होता. दिवसअखेर चलन ६०.४० वर स्थिरावले.
गेल्या दोन दिवसांतील घसरणीचा क्रम मोडून काढत रुपया दिवसअखेर तेजीत आला. कालच्या सत्रात त्यात १०६ पैशांची घट नोंदली गेली होती. महिन्याभरातील ही दिवसातील सर्वात मोठी आपटी होती.