कंपनीचा पाताळगंगा येथील उत्पादन निर्मिती प्रकल्प कार्यरत

शालोपयोगी वस्तू, रंग तसेच कला साहित्य निर्मितीतील प्रवर्तक तसेच आघाडीची उत्पादक कंपनी कोकुयो कॅम्लिनने महाराष्ट्रातील पाताळगंगा येथे उभारलेल्या नव्या प्रकल्पातून उत्पादन सुरू केले आहे. १०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प एमआयडीसी येथे वसलेला असून तो भारतीय बाजारपेठेच्या गरजा पुरवणारे तसेच जपान व इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठीचे प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून काम करेल.

Abhijit Patil Meet Devendra Fadanvis
भाजपात जाणार का? फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं सूचक विधान; म्हणाले, “कारखाना वाचवायचा…”
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
Ajit Pawar, Raj Thackeray,
राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्याबाबत अजित पवार काय म्हणाले?
liability determination order
सांगली जिल्हा बॅंकेतील गैरव्यवहारातील ५० कोटींची जबाबदार निश्चितेचे आदेश

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याचे उद्घाटन केले. याप्रसंगी कोकुयोचे संचालक आणि उपाध्यक्ष यासुहिरो कुरोदा, राजदूत केंजी हिरामत्सु, संचालक सुभाक दांडेकर, श्रीराम दांडेकर आदी उपस्थित होते.

न्हावा—शेवा बंदराजवळ असलेला कोकुयो कॅम्लिन पाताळगंगा कारखाना ५६ हजार चौरस मीटर जागेत वसलेला असून २७,२६८ चौरस मीटर जागेत उत्पादन केंद्र आणि कार्यालय आहे. ही जागा कोकुयो समुहाच्या जपान, चीन, व्हिएतनाम आणि थायलंड येथे असलेल्या कारखान्यांच्या तुलनेत सवार्धिक आहे.

पाताळगंगा कारखाना सुरू झाल्यामुळे कोकुयो कॅम्लिनने आतापर्यंत महाराष्ट्रात ठिकठिकाणी विखुरलेल्या उत्पादन सुविधा एकत्र केल्या आहे; कोकुयो कॅम्लिनची उत्पादने भारतीय बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर असून त्यात मार्कर्स, मेकॅनिकल पेन्सिल्स, क्रेयॉन्स इत्यादींचा समावेश आहे. ही उत्पादने या कारखान्यात तयार केली जातील, ज्यामुळे साखळी पुरवठा पायाभूत सुविधा मजबूत होतील व उत्पादन कार्यक्षमता विकसित होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

कोकुयो समूहाच्या संशोधन आणि विकास सुविधा, निर्मिती, निर्मिती तंत्रज्ञान आणि दर्जा नियंत्रण इत्यादी गोष्टींमध्ये गुंतवणूक करून अत्याधुनिक उत्पादने तयार करण्याचा समूहाचा विचार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कारखान्याची उत्पादनक्षमता संपूर्ण आणि विस्तारित असून वाहतूक खर्च व पर्यायाने निर्मिती खर्चात कपात होऊन एकंदर उत्पादन कार्यक्षमता वाढेल. तसेच कोकुयो कॅम्लिनने नव्या कारखान्यातून संपूर्ण भारतात माल पाठवण्याचे ठरवले असून त्यायोगे माल वाहतुकीचा खर्च आणखी कमी होईल, असा दावाही करण्यात आला आहे.

नवा कोकुयो कॅम्लिन कारखान्यातून २०० विविध उत्पादने तयार केली जाणार असून शाई, अढेसिव्ह तसेच प्लॅस्टिक इंजेक्शन मोल्डिंगसाठी कायमस्वरूपी संशोधन व विकास सुविधा राखेल.

वैविध्यपूर्ण कौशल्य आणि अनुभव असलेला कर्मचारी वर्ग एकाच ठिकाणी एकत्र आल्यामुळे सर्जनशील, नाविन्यपूर्ण आणि उच्च मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचा कोकुयो कॅम्लिनचा विचार असल्याचे सांगण्यात आले.