घरगुती उपकरणे बनवणारी भारतातील आघाडीची कंपनी अशी ओळख असणाऱ्या उषा इंटरनॅशनलने आगामी मेरी कोम या चित्रपटाबरोबरच्या सहकार्य उपक्रमाची नुकतीच घोषणा केली. हे साहचार्य अधिक दृढ बनवण्याच्या दृष्टिकोनातून उषा इंटरनॅशनलनेजगज्जेती ठरलेली आणि ऑलिम्पिक विजेती बॉक्सर मेरी कोमला नुकतेच ‘द हॅब’मध्ये आमंत्रित केले होते. याद्वारे कंपनी महिला सबलीकरण आणि क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देत असल्याचा दाखला मेरी कोमला पहायला मिळाला.
आंतरराष्ट्रीय बॉक्सपटूवर आधारित ‘मेरी कोम’ या चित्रपटाबरोबर सहकार्य करून खेळ, आधुनिक स्त्री आणि महिला सबलीकरणवर आधारित विविध प्रकारच्या उपक्रमांना कंपनीने पािठबा अधोरेखित केला. ‘द हॅब’ हे उषा समुहातील किरकोळ विक्रीचे एक दालन आहे. येथे शिवणकला अधिक समृद्ध आणि अभिनव बनवण्याच्या दृष्टिकोनातून डिझाइन, हस्तकला आणि फॅशन या तीन घटकांना एकत्र आणण्यात आले आहे. याबाबतच्या कार्यक्रमात नोकरदार, किशोरवयीन, लहानग्या अशा सर्व वयोगटातल्या आणि स्तरांमधल्या महिला सहभागी झाल्या. उषा जेनोम शिवण मशीन वापरून सामाजिक संस्थांतर्फे तयार करण्यात आलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू या कार्यक्रमात प्रदíशत करण्यात आल्या होत्या. यावेळी बॉक्सर मेरी कोम म्हणाली, उषा इंटरनॅशनलसारख्या उपक्रमांमुळे आíथकदृष्टय़ा दुर्बल महिला स्वयंपूर्ण बनल्या आणि आपल्या कुटुंबालाही आíथक मदत करत आहेत.