भारतात २५.३२ कोटी सक्रिय खेळाडू हे १६ ते ३० वर्षे वयोगटातील असून (८१ टक्के) भारतातील गेमिंग उद्योग ५,५४० कोटी रुपयांचा असून तो २०२३ पर्यंत ११,८८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असल्याचे ‘११विकेट्स डॉट कॉम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत मखारिया यांनी सांगितले.

‘११विकेट्स डॉट कॉम’ हे झपाटय़ाने वाढणारे ऑनलाईन फँटसी व्यासपीठ असून तिने भारतात पहिल्यांदाच ट्वेल्थ मॅन किंवा बदली खेळाडू दाखल केले आहे. बॉलीवूडची अभिनेत्री आणि ‘११विकेट्स डॉट कॉम’ची सदिच्छादूत सनी लिओनीने हिच्या प्रमुख उपस्थितीत ते नुकतेच सादर करण्यात आले.

गेमिंगच्या क्षेत्रामध्ये जी वृद्धी अनुभवाला येत आहे त्याचे एक कारण म्हणजे लोकांना त्यांची असलेली उपलाब्धता हे आहे. उच्च गतीचे इंटरनेट आणि अत्यंत उत्तम अशा ऑनलाइन पेमेंटची सुविधा यामुळे तसेच ‘आर्टीफीशियल इंटेलीजन्स’मध्ये होत असलेली वृद्धी यामुळे ऑनलाइन गेमिंग झपाटय़ाने वाढत असल्याचेही मखारिया यांनी सांगितले. भारतात ऑनलाईनची सद्दी आली आहे आणि ऑनलाइन गेमिंग खेळणाऱ्यांना अधिक चांगला अनुभव मिळतो आहे, असे ते म्हणाले.