हवाई वाहतुकीच्या क्षेत्रातील ५/२० फॉम्र्युला बदलाकरिता जुन्या विमान कंपन्या सरकारवर दबाव निर्माण करत असल्याच्या टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या आरोपानंतर राजकीय क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली.

याबाबत टाटा यांनी रविवारी ट्विट करत केले होते. टाटा यांच्या विदेशातील भागीदारांबरोबर दोन कंपन्या आहेत. ५/२० नुसार विदेशात व्यवसाय विस्तार करण्यासाठी स्थानिक कंपनीला किमान पाच वर्षे पूर्ण व २० विमानांचा ताफा असणे बंधनकारक आहे. केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी टाटा यांनी उपस्थित केलेल्या मुद्याबाबत सरकार विचार करत असून योग्यवेळी निर्णय घेऊ, असे म्हटले आहे. तर माजी केंद्रीय हवाई मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी, देशाचे हवाई नागरी धोरण बदलणे चुकीचे असल्याचे म्हटले.