म्युच्युअल फंड योजनांच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांचे निधी व्यवस्थापन करणाऱ्या सहाराला या व्यवसायासाठी आता सेबीने प्रतिबंध केला आहे. कंपनीला आता येत्या महिन्याभरात हा सारा व्यवसाय व निधी अन्य कंपनीला हस्तांतरित करावा लागणार आहे.
डिसेंबर २०१४ अखेर सहारा म्युच्युअल फंडाची गंगाजळी १४७ कोटी रुपयांची आहे. निधी व्यवस्थापनासाठी कंपनीला ऑक्टोबर २००६ मध्ये पहिल्या तीन वर्षांसाठी परवाना प्राप्त झाला होता. त्यानंतर पुन्हा तीन वर्षांसाठी त्याचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र जुलै २०१२ मधील पुन्हा नूतनीकरणासाठी आलेल्या अर्जावर सेबीने निर्णय देताना पोर्टफोलियो व्यवस्थापकाची नोंदणी रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.