मुंबई : टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीबद्दल टाटा सन्सचे संचालक मंडळ योग्य तो विचार विनिमयानंतर निर्णय घेईल, असे टाटा ट्रस्टने स्पष्ट के ले आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी ट्रस्टचे अध्यक्ष आणि टाटा सन्सचे सर्वात मोठे भागधारक या नात्याने संबिंधताना या पत्रकारद्वारे दिलासा दिल्याचे मानण्यात येते. टाटा समूहातील उच्च पदस्थांचा हवाला देत टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांची मुदतवाढ नक्की असल्याचे वृत्त आर्थिक वार्तांकन करणाऱ्या नियतकालिकात प्रसिद्ध झाल्यानंतर रतन टाटा यांनी या पत्राद्वारे खुलासा केल्याचे उद्योग वर्तुळात मानण्यात येते.

criminal case filed against former mayor in panvel
रेशनदूकानदाराला जाब विचारणाऱ्या माजी नगराध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल
BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Mira-Bhainder NCP district president Mohan Patil arrested
राष्ट्रवादी मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना अटक, शैक्षणिक संस्थेत घोटाळा केल्याचा आरोप

टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन यांची संचालक मंडळाने पहिल्यांदा जानेवारी २०१७ मध्ये निवड केली. पाच वर्षांसाठी झालेल्या नेमणुकीची मुदत फेब्रुवारी २०२२ पर्यंत असून त्यानंतर त्यांची फेरनियुक्ती होणे अपेक्षित आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची मुदत पाच वर्षे असून त्यानंतर कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार ते फेरनियुक्तीसाठी पात्र आहेत. विद्यमान अध्यक्षपदाच्या काळातील टाटा समूहातील कंपन्यांची कामगिरी आणि एन. चंद्रशेखरन यांच्या वर्तनाबाबत टाटा ट्रस्टचे विश्वस्त समाधानी असल्याने टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्ती निश्चित मानण्यात येत आहे. टाटा ट्रस्टचे विश्वस्त आणि तत्कालीन अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यातील मतभेद तीव्र झाल्यानंतर  टाटा सन्सच्या संचालक मंडळाने अविश्व ठराव मंजूर करून सायरस मिस्त्री यांना निष्कासित केल्यानंतर टाटा सन्सचे संचालक असलेल्या चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी निवड केली होती. चंद्रशेखरन हे टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसचे प्रमुख होते.