13 August 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी!

बाजाराचे वर्तन हे नेहमी तर्कसंगत विचारसरणीच्या विरोधात असते.

संग्रहित छायाचित्र

आशीष ठाकूर

चीनची घुसखोरी, सीमेवरील तणावाचे निमित्त साधत निफ्टीने ९,६०० चे आपले खालचे लक्ष्य साधले. भेदरलेल्या, घाबरलेल्या  निफ्टीने ‘तू तेव्हा तशी’ दाखवून दिले. त्यानंतर सीमेवरील परिस्थितीत तसूभरही सुधारणा नसताना, निफ्टी अगदी बेफिकिरीत पुन्हा दहा हजारच्या पल्याड झेपावली तेव्हा ‘तू अशी कशी?’ अशी आपसूकच विचारणा गुंतवणूकदारांकडून झाली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३४,७३१.७३

निफ्टी : १०,२४४.४०

या स्तंभातील १ जूनच्या ‘धडकी की धकधक’ या लेखामधील वाक्य होते – बाजाराचे वर्तन हे नेहमी तर्कसंगत विचारसरणीच्या विरोधात असते. म्हणून जेव्हा युद्धज्वराची परिस्थिती निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदारांच्या हृदयात धडकी भरते, पण बाजाराला चार हत्तींचे बळ येते. सरलेल्या सप्ताहात आपण हेच अनुभवले.

गेल्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे निफ्टी निर्देशांक १०,३०० वरून ९,६०० पर्यंत अतिजलद घसरण झाली, पण त्याच्या दुप्पट वेगाने सुधारणाही झाली. येणाऱ्या दिवसांत निर्देशांकांनी सातत्याने सेन्सेक्सवर ३४,००० आणि निफ्टीवर १०,००० चा स्तर राखल्यास, सेन्सेक्सचे प्रथम वरचे लक्ष्य ३५,००० ते ३५,५०० आणि निफ्टीवर १०,३५० ते १०,४५० असेल. त्यानंतर एक अल्पशी घसरण अपेक्षित असून या घसरणीला पुन्हा सेन्सेक्सवर ३४,००० आणि निफ्टीवर १०,००० चा आधार असेल. या स्तरावर पायाभरणी करत या तेजीचे अंतिम लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३७,००० ते ३७,८०० आणि निफ्टीवर १०,८०० ते ११,००० असेल.

आगामी तिमाही

निकालांचा वेध..

१) एशियन पेंट्स

६ तिमाही निकाल – मंगळवार, २३ जून

६ १९ जूनचा बंद भाव – १,६२२.२५ रुपये

६  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,५५० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,५५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,७५० रुपये. भविष्यात १,५५० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,८५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १,५५० ते १,७५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : निकालानंतर १,५५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,४०० रुपयांपर्यंत घसरण.

२) बँक ऑफ बडोदा

* तिमाही निकाल – मंगळवार, २३ जून

* १९ जूनचा बंद भाव – ४७ रुपये

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४२ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४२ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४९ रुपये. भविष्यात ४२ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ५४ रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ४२ ते ४९ रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ४२ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३८ रुपयांपर्यंत घसरण.

३) जीएनएफसी लिमिटेड

* तिमाही निकाल – शुक्रवार, २६ जून

* १९ जूनचा बंद भाव – १५५.३५ रुपये

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १६५ रुपये. भविष्यात १५० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १८० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १५० ते १६५ रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : १५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १४० रुपयांपर्यंत घसरण.

४) आयटीसी लिमिटेड

* तिमाही निकाल – शुक्रवार, २६ जून

* १९ जूनचा बंद भाव – १८४.१० रुपये

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १८० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १८० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य २०० रुपये. भविष्यात १८० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २२५ रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : १८० ते २०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : १८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १६० रुपयांपर्यंत घसरण

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 12:11 am

Web Title: article on market technique trend abn 97
Next Stories
1 नावात काय : विंडफॉल
2 अर्थ वल्लभ : आषाढस्य प्रथमदिवसे..
3 घरांच्या बाजारभावाची लक्ष्मणरेषा!
Just Now!
X