13 July 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : ..ओळखून आहे तुझे बहाणे!

अमेरिका-इराण युद्धाचे कारण पुढे करत निफ्टीने ११,९२९ पर्यंतची घसरण ८ जानेवारीला पूर्ण केली आणि पुन्हा तेजीची घोडदौड कायम राखली

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

या स्तंभातील गेल्या महिन्यातील विविध लेखांवरून नजर फिरवली असता, ‘फेबुनासी कालमापन पद्धती’प्रमाणे जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात निफ्टी आपले पहिले लक्ष्य १२,३०० साध्य करेल आणि त्यानंतर निफ्टी निर्देशांकावर १२,००० ते ११,९०० पर्यंतची हलकीशी घसरण अपेक्षित असेल. वरील वाक्य काळाच्या कसोटीवर तपासता, २ जानेवारीला निफ्टीने १२,२८२चा ऐतिहासिक उच्चांकी बंद भाव नोंदविला. अमेरिका-इराण युद्धाचे कारण पुढे करत निफ्टीने ११,९२९ पर्यंतची घसरण ८ जानेवारीला पूर्ण केली आणि पुन्हा तेजीची घोडदौड कायम राखली. निफ्टीच्या या अवखळ, खटय़ाळ चालीला कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या ‘लाजून हासणे अन हासून ते पाहणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे’ या काव्यपंक्ती अगदी चपखल बसतात. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४१,५९९.७२

निफ्टी : १२,२५६.८०

येणाऱ्या दिवसात निर्देशांकाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा हा सेन्सेक्सवर ४०,७०० ते ४१,८०० आणि निफ्टीवर १२,००० ते १२,३०० असेल. या स्तरावर पायाभरणी होऊन सेन्सेक्स ४२,५०० आणि निफ्टीवर १२,४५० ते १२,५००चे लक्ष्य दृष्टिपथात येईल. गुंतवणूकदारांनी निर्देशांकाच्या प्रत्येक वाढीव टप्प्यावर २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ांत नफ्यात असलेल्या समभागांची विक्री करून तो नफा गाठीशी बांधत जाणे श्रेयस्कर.

आगामी तिमाही निकालांकडे..

१) एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड

* तिमाही निकाल – शुक्रवार, १७ जानेवारी

* शुक्रवार, १० जानेवारीचा भाव – ५८०.५० रु

* निकालानंतरचा केंद्रबिंदू स्तर – ५६० रु

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५६० रुपयांचा स्तर राखत, समभागाचे पहिले वरचे लक्ष्य ५९० रुपये. भविष्यात ५६० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ६३० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ५६० ते ५९० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशाजनक निकाल : ५६० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम ५३० रुपये व त्यानंतर ५०० रुपयांपर्यंत घसरण.

२) एल अँड टी फायनान्स होल्डिंग लिमिटेड

* तिमाही निकाल – शुक्रवार, १७ जानेवारी

*  शुक्रवार, १० जानेवारीचा भाव- १२१.८५ रु.

* निकालानंतरचा केंद्रबिंदू स्तर – ११० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ११० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १३० रुपये. भविष्यात ११० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १४५ रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ११० ते १३० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशाजनक निकाल : ११० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम १०० रुपये व त्यानंतर ८५ रुपयांपर्यंत घसरण.

३) एचडीएफसी बँक

*  तिमाही निकाल – शनिवार, १८ जानेवारी

*  शुक्रवार, १०जानेवारीचा भाव- १,२८३.२० रु.

* निकालानंतरचा केंद्रबिंदू स्तर – १,२६० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,२६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,३०० रुपये. भविष्यात १,२६० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,३५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १,२६० ते १,३०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : १,२६० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,२०० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 4:14 am

Web Title: article on market trends nifty index abn 97
Next Stories
1 अर्थ वल्लभ : अबोल हा पारिजात आहे!
2 क.. कमॉडिटीचा : आखातातील संघर्षांला चीन-अमेरिका ‘तहा’ची किनार
3 कापसात ‘आर्बिट्राज’ व्यापाराची संधी
Just Now!
X