फंडाविषयक विवरण

Capture-hhj

 

फंडाची पहिल्या दहा उद्योग क्षेत्रातील समभाग गुंतवणूक

ff

सरकारी रोखे वगळता अन्य प्रकारच्या स्थिर उत्पन्न देणाऱ्या रोखे प्रकारात गुंतवणूक करणारा हा फंड आहे. स्थिर उत्पन्न गुंतवणुकीतून मिळणारा परतावा प्रामुख्याने रोख्यांची पत व रोख्यांची मुदत यावर ठरत असतो. ज्याला रोख्यांच्या परिभाषेत अनुक्रमे Credit Play व Duration Play संज्ञा वापरल्या जातात. हा फंड  Credit Play या प्रकारची गुंतवणूक धोरण राबविणारा फंड आहे. ‘ट्रिपल ए’ ते ‘बी डबल ए थ्री’ या दरम्यानची पत असणारे रोखे गुंतवणूकपात्र रोखे समजले जातात. हा फंड मध्यम गुंतवणूक पत असलेल्या रोख्यांत गुंतवणूक करून परताव्याचा दर व मुदतपूर्तीनंतर वेळेवर पसे मिळण्याची शक्यता यांचा समतोल साधून निर्णय घेत असतो. व्याजदर कपात नुकतीच होऊन गेल्याने व भविष्यात लवकर व्याजदर कपात अपेक्षित नसल्याने जी सेक फंडांपेक्षा कॉर्पोरेट बाँड फंडात गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे ठरणार आहे. समान मुदतीच्या कंपन्यांच्या रोख्यांच्या परताव्याचा दर सरकारी रोख्यांच्या परताव्याच्या दराहून अधिक असतो. परंतु या प्रकारच्या रोख्यांच्या मुदतपूर्तीनंतर वेळेवर रक्कम परत न मिळण्याचा धोका अधिक असल्याचा हा परिणाम होय. सध्या गाजत असलेल्या अ‍ॅम्टेक ऑटो, जेएसडब्ल्यू स्टील व अन्य काही कंपन्या गुंतवणूकयोग्य पत असून देखील मुदतपूर्तीनंतर वेळेवर पसे परत करू शकल्या नाहीत. एखाद्या रोख्यात गुंतवणूक करावी किवा कसे हा निर्णय व्यावसायिक निधी व्यवस्थापक अधिक चांगल्या प्रकारे घेत असल्याने, बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा अधिक धोका पत्करून अधिक परताव्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांनी या फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करावा.

स्पर्धक फंडाचा कामगिरी: तुलनात्मक परतावा (%)

78

 

Capture

– mutualfund.arthvruttant@gmail.com