29 October 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : दीर्घावधीसाठी धारणेचे उमदे व्यवसाय क्षेत्र

एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून कुठलेही कर्ज नसलेल्या कॅम्सचा जरूर विचार करा.

अजय वाळिंबे

नुकतीच आयपीओद्वारे शेअर बाजारात सूचिबद्ध झालेली कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेस लिमिटेड ऊर्फ कॅम्स ही भारतातील आर्थिक पायाभूत सुविधा आणि सेवा पुरवणारी एक आघाडीची तंत्रज्ञानाधारित कंपनी आहे. कॅम्स ही म्युच्युअल फंडाची भारतातील सर्वात मोठी रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट असून, क्रिसिलच्या नोव्हेंबर २०१९ च्या अहवालानुसार कंपनीचा म्युच्युअल फंडाचा एकूण बाजार हिस्सा ६९.४ टक्के आहे. जून २०२० पर्यंत कंपनीकडे ७.१८ कोटी गुंतवणूकदार खाती असून इक्विटी तसेच डेट फंडांची ७० टक्क्यांहून जास्त मालमत्ता (एयूएम) कॅम्सकडे आहे. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांत एचडीएफसी, आयसीआयसीआय प्रुडेंशियल, एसबीआय, डीएसपी, फ्रँकलिन टेम्पलटन, आदित्य बिर्ला तसेच कोटक महिंद्र यासारख्या दिग्गज म्युच्युअल फंडांचा समावेश आहे.

कंपनीच्या प्रमुख सेवांमध्ये डिव्हिडंड प्रोसेसिंग, ट्रान्झ्ॉक्शन ओरिजनेशन इंटरफेस, पेमेंट, ट्रान्झ्ॉक्शन एक्झिक्युशन, मिडिएरी एम्पॅनेलमेंट, रिपोर्ट जनरेशन, इन्व्हेस्टर इंटरफेस, सेटलमेंट, अनुपालनसंबंधित सेवा आणि दलाली संगणनासह तंत्रज्ञान-आधारित सेवांचा समावेश होतो. याखेरीज कंपनी इलेक्ट्रॉनिक पेमेंट कलेक्शन सव्‍‌र्हिसेस, विमा, पर्यायी गुंतवणूक निधी व्यवसाय, बँकिंग आणि नॉन-बँकिंग व्यवसाय, केवायसी नोंदणी एजन्सी व्यवसाय आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन व्यवसाय या विविध क्षेत्रांतील सेवा प्रदान करते. या सेवा पुरवण्यासाठी कंपनीचे देशांतर्गत विस्तृत नेटवर्क असून यांत २५ राज्ये, २७८ सेवा केंद्रे आणि पाच केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो.

एचडीएफसी, वारबर्ग पिन्कस, फेरिंग कॅपिटल आणि अ‍ॅकसिस (अउरर) इन्व्हेस्टमेंट्स हे प्रमुख भागधारक असलेल्या कॅम्सचा आयपीओ नुकताच येऊन गेला. १२३० रुपयांना दिलेला हा शेअर १५५० रुपयांना सूचिबद्ध झाला होता. मात्र झटपट फायद्याच्या उद्देशाने गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने हा शेअर सध्या १३३० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. कंपनी नुकतीच सूचिबद्ध झाल्याने उलाढाल जास्त आहे आणि साहजिकच बीटादेखील जास्त आहे. एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून कुठलेही कर्ज नसलेल्या कॅम्सचा जरूर विचार करा.

आजच्या परिस्थितीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचविलेले शेअर्स हे तुम्हाला खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्यात करावी.

कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेस लि.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

२. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2020 12:02 am

Web Title: computer age management services ltd stock company profile zws 70
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : मुबलक तरलता, अनावर उत्साह!
2 अर्थ वल्लभ : उदयोन्मुख मल्टिकॅप
3 बाजाराचा तंत्र कल : अचूक वाटचाल
Just Now!
X