संजय लीला भन्साळी यांची ‘हीरामंडी’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या प्रिमिअरमध्ये बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘हीरामंडी’तील अभिनेत्री रिचा चड्ढा व सदाबहार रेखा यांचा आहे.

रिचा चढ्ढा आणि अली फजल लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात रिचाने ती आई होणार असल्याची आनंदाजी बातमी दिली होती. ती सध्या तिच्या आगामी ‘हीरामंडी’ सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच या सीरिजचं मुंबईत प्रिमिअर ठेवण्यात आलं. या प्रिमिअरला सलमान खान, रश्मिका मंदाना, आलिया भट्ट, नीतू कपूरपासून ते रेखा अशा अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Chandrashekhar Bawankule,
“काँग्रेसने पुन्हा एकदा इंग्रजांचा काळ आणला,” चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका; म्हणाले, “नाना पटोलेंनी…”
ravindra waikar on evm hacking
“…म्हणून ४८ मतांनी माझा विजय झाला”; रवींद्र वायकरांनी सांगितलं मतांचं गणित; ईव्हीएम हॅक करण्याच्या आरोपावर म्हणाले…
Parth Pawar, Rohit Pawar, Ajit Pawar,
पक्षात नाराज असल्याच्या चर्चांवर रोहित पवारांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “माझ्या स्वभावानुसार…”
krupal tumane target state bjp chief chandrashekhar bawankule
रामटेकच्या पराभवावरून महायुतीत महाभारत, तुमानेंकडून भाजप लक्ष्य
nitish kumar
“मोदी सांगतील ते मान्य करून पुढे जाऊ”; नितीश कुमारांचाही चर्चांना पूर्णविराम!
Navneet Rana Crying Loksabha Elections Results In Amravati
अमरावतीचा निकाल पाहून नवनीत राणा रडल्या? Video वर लोक म्हणतायत, “मशिदीकडे बघून बाण मारताना..”, खरा संबंध काय?
BJP MLA Vanathi Shrinivasan Shows Go Back Modi Card Viral Photo
भाजपाच्या महिला आमदारांनी झळकवले ‘गो बॅक मोदी’चे पोस्टर? सद्गुरूंचा संबंध पाहून लोक चक्रावले, ही चूक पाहिलीत का?
Narendra Modi
“थंड चहा दिला म्हणून कानाखाली मारायचे, लहानपणापासूनच अपमान-शिवीगाळ नशिबात…”, मोदींनी सांगितली करुण कहाणी

“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”

या प्रिमिअरमध्ये रेखा यांनी गरोदर रिचाबरोबर अशी एक खास कृती केली, ज्याचं सोशल मीडियावर चाहते कौतुक करत आहेत. विरल भयानी या पापाराझी अकाउंटवरून रिचा चढ्ढा आणि रेखा यांचा एक अतिशय प्रेमळ व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रेखा सर्वात आधी रिचाची विचारपूस करतात, मग त्या गरोदर रिचाच्या पोटावर प्रेमाने किस करून तिच्या बाळाला आशीर्वाद देतात. इतकंच नाही तर रेखा रिचालला काहीतरी समजावून सांगताना या व्हिडीओत दिसतात.

श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

रेखा व रिचा यांचा हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकरी रेखा यांच्या प्रेमळ कृतीचं खूप कौतुक करत आहेत. रेखा यांनी रिचाची ज्यापद्धतीने विचारपूस केली आणि तिच्या बाळाला आशीर्वाद दिले, ते पाहून नेटकरी भारावले आहेत. त्यांनी व्हिडीओवर कमेंट्स करून रेखा यांचं कौतुक केलं आहे. एका युजरने तर रेखा यांच्या प्रेमळ स्वभावाचं कौतुक केलं, तर जया बच्चन अॅटिट्यूड दाखवत उगाच नखरे करतात असं म्हटलं.

rekha richa chadhha video
व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, संजय लीला भन्साळी यांची ‘हिरामंडी’ ही वेबसिरीज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, फरदीन खान, शेखर सुमन, अध्ययन सुमन यांच्या भूमिका आहेत.