या फंडाच्या गुंतवणूक परिघात शंभराच्या जवळपास कंपन्यां आहेत. पकी साठ ते सत्तर कंपन्यांना आमच्या गुंतवणुकीत एका वेळी स्थान असेल. आम्ही विशिष्ट उद्योगक्षेत्राचा विचार न करता, आमच्या गुंतवणूकतत्त्वाला साजेशा कंपन्यांचा समावेश आम्ही गुंतवणुकीत करू. गुंतवणूकदारांना सुयोग्य परतावा देण्यासोबत जोखीम नियंत्रणाला आमचे प्राधन्य असेल.
’ नोबुटाका किटाजिमा
मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग)
एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंड
फंडाविषयक विवरण
फंडाचा गुंतवणूक प्रकार    :    समभाग गुंतवणूक (इक्विटी फंड)
जोखीम प्रकार    :    समभाग गुंतवणूक असल्याने धोका अधिक  (मुद्दलाची शाश्वती नाही)     
गुंतवणूक    :    प्रामुख्याने समभाग गुंतवणूक आणि जास्तीत जास्त ३५ टक्के गुंतवणूक अल्प मुदतीचे रोखे (कॉलमनी)
निधी व्यवस्थापक     :    या फंडाचे निधी व्यवस्थापक नोबुटाका किटाजिमा असून ते  २०१२ पासून भारतात एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंड या             फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) या            पदावर कार्यरत आहेत. त्यांना २६ वषार्ंचा जागतिक पातळीवरील समभाग गुंतवणुकीचा अनुभव आहे. भारतात  येण्याआधी त्यांनी न्यूयॉर्क व लंडन येथे नोमुराच्या विविध योजनांचे पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून काम केले आहे.
गुंतवणूक पर्याय    :    वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड पे आऊट/रिइन्व्हेस्टमेंट)
फंड खरेदीची पद्धती    :    प्रारंभिक खुली विक्री २ ते १६ फेब्रुवारीदरम्यान, त्यानंतर युनिट्सच्या खरेदीसाठी, मोबाईल फोनद्वारे टकऊउअढ  टाइप  करून 9930718555 वर एसएमएस पाठवा, कंपनीचा प्रतिनिधी संपर्क करेल.
av-05
एलआयसी व बहुराष्ट्रीय समूह नोमुरा यांच्या संयुक्त मालकीच्या एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडाने आपली मिडकॅप योजना गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिली आहे. योजना गुंतवणूकीसाठी कायम खुली असलेली (ओपन एंडेड) योजना आहे. नोमुराने केवळ एका निद्रिस्त भागीदाराची भूमिका न वठवता आपल्या गुंतवणूक कौशल्य व अनुभवाच्या जोरावर कंपनीत व्यावसायिक शिस्त बाणवली. श्रम विभाजनाच्या पातळीवर समभाग गुंतवणूक करणाऱ्या योजना नोमुरा तर रोखे गुंतवणूक असलेल्या योजना एलआयसी सांभाळेल अशी दोघांच्या सोयीची सध्याची योजना आहे. गुंतवणूक कौशल्यामुळे एका वर्षांच्या परताव्याच्या दराच्या तुलनेत या योजना आपापल्या फंड गटात सप्टेंबर २०१४ पासून अव्वल कामगिरीच्या जोरावर पहिल्या पाच क्रमांकात आपले स्थान टिकवून आहेत. सचिन रेळेकर हे या योजनेचे सह-निधी व्यवस्थापक आहेत. एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडात दाखल होण्यापूर्वी ते टाटा म्युच्युअल फंडात निधी व्यवस्थापक होते.
सहा वर्षांपासून महागाईचा दर चढा राहिल्याने रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर वाढवावे लागले. या काळात महागाईचा सरासरी दर आठ टक्के होता. ही पातळी मागील पन्नास वर्षांतील महागाईच्या सरसरी दराहून अधिक होती. रिझव्‍‌र्ह बँकेने राबविलेल्या धोरणाचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याने रिझव्‍‌र्ह बॅंकेने १५ जानेवारी रोजी पहिली व्याजदर कपात केली. नऊ महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या सरकारने वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ४.१ टक्क्याच्या आत राखली जाण्याला प्राधान्य दिले आहे.
भारताने पंधरा वीस वर्षांपूर्वी दूरसंचार क्षेत्रातील क्रांती अनुभवली आता याचा पुढील टप्पा म्हणजे इंटरनेट क्रांती. देशातील प्रत्येक ग्रामपंचायत ब्रॉडबँडने जोडली जाण्याचे सरकारचे धोरण आहे. यामुळे देशांत ब्रॉडबँड, ई-कॉमर्स, दळणवळण या क्षेत्रात व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या धोरणांमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या कंपन्यांना व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. या सर्वाचा परिपाक या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीत दिसेल.
आज म्युच्युअल फंड उद्योगात काही अनिष्ट प्रथांचा शिरकाव झाला आहे. म्युच्युअल फंड व्यवसायात नफा मिळविण्यासाठी मालमत्ता वाढविणे व मालमत्ता वाढविण्यासाठी विक्रेत्यांना आपल्या योजना विकण्यासाठी कमिशन/मोबदल्याच्या रूपात मोठे आमिष दाखविले जाते. अलीकडे २३ जानेवारी रोजी विक्रीसाठी बंद झालेल्या एका फंड घराण्याने तीन वर्षांच्या मुदतबंद योजनेतून एक हजार कोटी गोळा करतानाच या आधीचा विक्रम मोडल्याचे आवर्जून नमूद केले. हे या स्पध्रेचेच द्योतक आहे. या प्रकारच्या मुदत बंद योजना विकण्यासाठी सात टक्के इतके कमिशन दिल्याची वदंता असल्यानेच या अपप्रवृत्तीवर सेबीचे अध्यक्ष यू के सिन्हा यांनी म्युच्युअल फंडांची शिखर संस्था ‘अ‍ॅम्फी’च्या वार्षकि सर्वसाधारण सभेत कोरडे ओढले. तरी म्युच्युअल फंडांकडून मुदतबंद योजनांचा (क्लोज एंडेड) रतीब सुरु आहे. विक्रेतेही अशा जास्त जोखमीच्या योजना गुंतवणूकदारांच्या माथी मारून वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत. ‘‘रोम वॉज नॉट बिल्ड इन अ डे’’ या इंग्लिश सुभाषिताचे स्मरण गुंतवणूकसमयी नेहमी ठेवायला हवे. अनेक दशकांच्या परिश्रमानंतर रोमसारख्या चिरकाल सौंदर्य टिकणाऱ्या नगराची निर्मिती झाली. चिरकाल टिकणाऱ्या संपत्तीची निर्मिती करायची असेल तर, गुंतवणूकसुद्धा दीर्घकाल करायला हवी. पण यासाठी क्लोज एंडेड फंड उपयोगाचे नाहीत. अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी कायम खुला असलेला दर्जेदार फंड निवडायला हवा. अपेक्षित संपत्तीची निर्मिती करण्याचा अनुभव असलेला कुशल निधी व्यवस्थापक नोबुटाका किटाजिमा यांच्या रुपाने भारतीय गुंतवणूकदारांना उपलब्ध झाला आहे. नोबुटाका किटाजिमा यांची गुंतवणूक पद्धत ही सेहवागसारखी धुंवाधार फटक्यांची बरसात करतांना झेल उडून बाद होण्याची शक्यता असलेली नसून राहुल द्रविडच्या शैलीप्रमाणे खेळपट्टीवर टिकून धावफलक सतत हलता ठेवतानाच भरवशाची दीर्घ खेळी करणारी आहे. म्हणून क्लोज एंडेड फंडाच्या मोहात न अडकता सातत्याने गुंतवणुकीस खुला असलेल्या या फंडाचा ‘एसआयपी’ पध्दतीने संपत्तीची निर्मिती करण्यासाठी गुंतवणूकदारांनी  विचार करावा.  
(स्त्रोत: सेबीने मंजूर केलेले ‘स्किम इन्फम्रेशन डॉक्युमेंट’ व या योजनेच्या सादरीकरणातून उपलब्ध माहितीनुसार हे दोन्ही दस्तऐवज एलआयसी नोमुराच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.)
mutualfund.arthvruttant@gmail.com